Mahayuti Cabinet Meeting : कोणत्या मंत्र्यांनी केला हिंदी सक्तीला विरोध; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमके काय घडले?

Maharashtra ministers Hindi opposition News : भाजपच्या एका मंत्र्याने विरोधात भूमिका घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी देखील विरोध केला.
Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी रविवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीप्रसंगी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनीच हिंदी भाषेबाबतचा मुद्दा चर्चेत आणला. एकीकडे अजित पवार यांच्या मंत्र्यांनी या पूर्वीच हिंदीला विरोध केला होता. तर दुसरीकडे यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध केला. त्यानंतर भाजपच्या एका मंत्र्याने विरोधात भूमिका घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी देखील विरोध केला.

मंत्रिमंडळ बैठकीत हिंदी भाषा सक्तीची करण्यापूर्वी त्यासाठी अभ्यास गट नेमण्याचे ठरले आहे. या बैठकीत शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी हिंदी सक्तीला कशा प्रकारे विरोध होत आहे, याची माहिती दिली. आतापर्यंत विरोधकांनी कुठले मुद्दे मांडले आहेत, त्याविषयी माहिती त्यांनी दिली. त्यासोबतच राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा तपशील सांगितला.

विरोधकांची भेट घेऊन तिसऱ्या भाषेचे धोरण मांडण्याची जबाबदारी पार पाडली. मात्र, या मुद्द्यावर विरोधक आक्रमक असल्याचा मुद्दा बैठकीत भुसे यांनी मांडला. हे सर्व सांगतानाच त्यांनी विरोधकांचा वाढता विरोध पाहता हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेण्यास भाग पाडले.

Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Raj-Uddhav Thackeray: ठाकरे बंधुंच्यासमोर सरकार झुकले; रणनीतीतील बदल की जनभावनेचा स्वीकार?

त्यानंतर भर बैठकीतच शिवसेनेचे (Shivsena) मंत्री शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील यांनी देखील हिंदी सक्तीला विरोध केला. आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे सांगत त्यांनी हिंदी भाषा सक्तीला विरोध केला.

Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
BJP President : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित, संघाने देखील दिला ग्रीन सिग्नल, तारीख ठरली!

त्यासोबतच भाजपच्या एका मंत्र्यांनी हिंदीच्या मुद्द्याला विरोध केला. त्याचा फायदा ठाकरे बंधू एकत्र आल्याने विरोधकांना फायदा होऊ शकतो, असे स्पष्ट केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी देखील हिंदी सक्तीच्या बाबत होत असलेल्या या चर्चेला दुजोरा दिला.

Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
NCP News : पवारांच्या लाडक्या आमदाराची कबुली; ‘साहेब अन्‌ दादांनी एकत्र यावे, अशी पवारांसह जयंत पाटील, सुळेंना विनंती केली होती’

या बैठकीवेळी सरकारने निर्णय मागे घेतला नाही तर शिवसेनेचे मंत्री देखील आक्रमक होण्याची शक्यता होती. अजित पवार यांनी या पूर्वीच हिंदी सक्तीला विरोध केला आहे. तर शिवसेना देखील विरोधात जात असेल तर सरकारमध्ये विरोध असताना निर्णय लादला जात असल्याचा चुकीचा मेसेज जाईल, त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत झालेलया या चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत हा निर्णय जाहीर केला.

Mahayuti : Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Shivsena politics : शिवसेनेत बंड! शहरप्रमुख भडकला; म्हणाला, 'आता खंजीर खुपसणाऱ्यासोबत...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com