Rajendra Jain : राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी मिळवणारे राजेंद्र जैन कोण? असा आहे राजकीय प्रवास

NCP Rajya Sabha Candidate Rajendra Jain : राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र, सुनेत्रा पवारांनी धक्कातंत्राचा वापर करत चर्चेत नसलेल्या राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा केली.
NCP Rajya Sabha Candidate Rajendra Jain
NCP Rajya Sabha Candidate Rajendra Jainsarkarnama
Published on
Updated on

NCP Rajya Sabha Candidate : राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. छगन भुजबळ, नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा सुरू असताना धक्कातंत्र वापरत राजेंद्र जैन यांचे नाव घोषित करण्यात आले. त्यामुळे सर्व राजकीय पंडितांचे अंदाज फोल ठरले.

दिग्गज नेत्यांना मागे टाकत उमेदवारी मिळवणारे राजेंद्र जैन कोण? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र जैन हे माजी केंद्रीय मंत्री, खासदार प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांचे स्वीय सहाय्यक (पीए) म्हणून त्यांनी आपली कारकिर्द सुरू केली होती.

भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून ते विधान परिषदेचे माजी आमदार राहिले आहेत. गोंदीया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून गेल्या वर्षी त्यांची निवड झाली होती. यंदा विधान परिषदच्या निवडणुकीतमध्ये उमेदवारीसाठी त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र, भाजपला हा मतदारसंघ मिळाल्याने त्यांना आपला दावा सोडावा लागला होता.

पक्ष संघटनेत काम करण्याचा त्यांना दीर्घ अनुभव आहे. विविध जिल्ह्यांचे निरीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

NCP Rajya Sabha Candidate Rajendra Jain
NCP News : राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर; प्रफुल पटेलांच्या बालेकिल्ल्यातील नेत्याला संधी

प्रफुल पटेल खूश...

मागील काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल पटेल यांचे महत्त्व कमी केले जात असल्याची चर्चा होती. निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात त्यांच्या पटेल यांच्या पदाचा उल्लेख नव्हता. त्यामुळे ते पक्षात नाराज असल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्यांचे निकटवर्तीय असलेले राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याने पक्षात त्यांचे वजन कायम असल्याचा संदेश दिला असल्याचे मानले जात आहे.

NCP Rajya Sabha Candidate Rajendra Jain
Beed Murder Case : परळी तौहीद खान हत्या प्रकरणातील 'ती' होंडा सिटी कार सापडली; डिक्कीत मृतदेह ठेवून आरोपी फिरत होते शहरभर!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com