Beed Murder Case : परळी तौहीद खान हत्या प्रकरणातील 'ती' होंडा सिटी कार सापडली; डिक्कीत मृतदेह ठेवून आरोपी फिरत होते शहरभर!

Parli Tauheed Khan Murder Case : परळीतील तौहीद खान याच्या निर्घृण हत्या प्रकरणात आता एक नवी आणि धक्कादायक माहिती समोर आली असून हत्या प्रकरणात वापरण्यात आलेली गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.
Parli Tauheed Khan Murder Case
Parli Tauheed Khan Murder Casesarkarnama
Published on
Updated on

Beed Crime News : बीड जिल्ह्यातील परळीत घडलेल्या तौहीद खान निर्घृण हत्या प्रकरणात आमदार धनंजय मुंडे यांनी या हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊ नये, असे आवाहन केले होते. तसेच आरोपींवर लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल होण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचेही आश्वासन त्यांनी दिले होते.

दरम्यान आता या प्रकरणातील तपासात पोलिसांना मोठं यश आले असून या प्रकरणात वापरण्यात आलेली 'होंडा सिटी' कार परळी पोलिसांनी जप्त केली आहे. धक्कादायक म्हणजे तौहीदची हत्या केल्यानंतर याच कारच्या डिक्कीत त्याचा मृतदेह ठेवून फिरवण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, परळी येथे 31 मे रोजी तौहीद खान या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येने परळीमध्ये तणावाचे वातावरण होते. तर घटना घडली त्या दिवशी मयत तौहीद खान आणि आरोपी हे दोघेही याच होंडा सिटी कारमधून परळी शहरातील अनेक भागात एकत्र फिरले होते. त्यानंतर आरोपी तौहीदला घेऊन आपल्या गावी गेले. तिथेच आरोपींनी तौहीदचा अत्यंत निर्घृणपणे गेम केला.

Parli Tauheed Khan Murder Case
Pune Murder Case : पुण्यात मध्यरात्री थरार! मित्राने सपासप वार करत केली वर्गमित्राची निर्घृण हत्या; धक्कादायक कारण समोर?

अपघाताचा बनाव रचण्याचा होता डाव!

तर हत्या केल्यानंतर आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी तौहीदचा मृतदेह त्याच कारच्या डिक्कीत ठेवून शहरभर फिरले. धक्कादायक म्हणजे तौहीदचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ते फिरत होते.

यानंतर त्यांनी तौहीदचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकून देऊन देत हा केवळ एक 'अपघात' असल्याचा बनाव केला. जो फसला आणि आरोपींचा क्रूर डाव असल्याचे नंतर उघड झाले. तर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी गाडी आणि डिक्कीही पूर्णपणे धुवून टाकली.

Parli Tauheed Khan Murder Case
Kedgaon double murder case : केडगाव दंगलप्रकरणी मोठा निकाल! अनिल राठोडांसह 600 शिवसैनिक निर्दोष; 2018चे खळबळजनक प्रकरण

गाडी जप्त आणि मालकाचा' शोध सुरू

दरम्यान आता पोलिसांना मिळालेल्या अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे, परळीतील स्नेह नगर भागातील एका कॉलनीतून ही कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तर आता याप्रकरणात वापरण्यात आलेली गाडी कोणाची आहे याचा शोध पोलिस घेत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com