'आयटम आहे का' असे म्हणणाऱ्या शिवसैनिकाला महिलेकडून चोप ; व्हिडिओ व्हायरल
sarkarnama

'आयटम आहे का' असे म्हणणाऱ्या शिवसैनिकाला महिलेकडून चोप ; व्हिडिओ व्हायरल

फोन करुन 'आयटम आहे'अशी मागणी या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने रिक्षाचालक महिलेकडे केली होती. हा पदाधिकारी स्थानिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Published on

विरार : शिवसेनेच्या विभागप्रमुखाला महिलेकडून मारहाण होत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिलेच्या तक्रारीवरुन या शिवसेनेच्या (shivsena)विभागप्रमुखावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरार येथे हा प्रकार घडला. या घटनेमुळे स्थानिक महिला रिक्षाचालक आक्रमक झाल्या आहेत. परिसरात संताप व्यक्त होत आहे.

फोन करुन 'आयटम आहे'अशी मागणी या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने रिक्षाचालक महिलेकडे केली होती. हा पदाधिकारी स्थानिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकारानंतर महिला रिक्षाचालकाने त्याला भररस्त्यात चपलेनं चोप दिला.

'आयटम आहे का' असे म्हणणाऱ्या शिवसैनिकाला महिलेकडून चोप ; व्हिडिओ व्हायरल
राज्यात लवकरच ७२०० पोलिसांची भरती : वळसे-पाटील

जितू खाडे असं या शिवसैनिकाचं नाव आहे. तो विरारमध्ये शिवसेनेच्या विभाग प्रमुख पदावर काम करीत असल्याचे सुत्रांनी सांगितले. पीडित महिला ही विरार येथे राहते. जितू तिला फोन करुन आयटम आहे का? अशी विचारणा करुन नेहमी त्रास देत होता. त्याचा त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने त्याला रिक्षामध्ये बसलेला असताना चपलेने बडवलं.

या महिलेने त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. जितू सध्या फरार आहे. 'वरिष्ठांनी बोलून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, जितूच्या कृत्याला आमचा पाठिंबा नाही, '' असे शिवसेनेचे पालघर उपजिल्हा प्रमुख दिलीप पिंपळे यांनी सांगितले.

या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आरोपीने काही काळानंतर घटनास्थळावरुन पोबारा केल्यानंतर महिला रिक्षाचालकाच्या तक्रारीवरुन विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे स्थानिक महिला रिक्षाचालकांकडून संताप व्यक्त होत आहे.

'आयटम आहे का' असे म्हणणाऱ्या शिवसैनिकाला महिलेकडून चोप ; व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्री ठाकरेंचा मेहुणा सोमय्यांच्या रडारवर, म्हणाले..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com