municipal council elections impact : आचारसंहितेच्या सावटाखाली कामांची लगीनघाई! ZP, नगरपरिषदेमुळे महापालिकेच्या विकास कामांना ब्रेक

Political News : निवडणुकीची घोषणा आयोगाकडून झाल्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे कामे उरकण्याची लगीनघाई सुरु असून त्यामुळे येत्या काळात विकास कामाना ब्रेक लागणार आहे.
Election Commission
Election Commission Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा येत्या आठवडाभरात होऊ शकते. त्यामुळे राज्यभरात आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसांत कामे उरकण्याची गडबड प्रशासकीय पातळीवर सुरु आहे. राज्यात पहिल्यांदा नगरपालीका व नगरपंचायतीच्या निवडणूका होणार आहेत तर त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तर शेवटच्या टप्प्यात महापालिकेच्या निवडणूका होणार आहेत.

त्यामुळे 7 नोव्हेंबरला नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्राची यादी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा आयोगाकडून झाल्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे कामे उरकण्याची लगीनघाई सुरु असून त्यामुळे येत्या काळात विकास कामाना ब्रेक लागणार आहे. विशेष म्हणजे या निवडणुका जाहीर झाल्यानंतर महापालिकेलाही आचारसंहिता लागू होणार आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात नगरपालिका, जिल्हा परिषदा, महापालिकेच्या निवडणुकाची घोषणा होणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग, गट, गण रचना झाल्या असून मतदार याद्यांचे कामही सुरू झाले आहे. विशेषतः आरक्षणाच्या सोडती पार पडल्याने आता पहिल्या टप्प्यात नागरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणूका होणार आहेत.

Election Commission
BJP setback: भाजपला धक्का! शिंदे, अजितदादांच्या मंत्र्यांचे सूर बदलले, विरोधकांच्या मतचोरीविरोधाला बळ मिळणार?

निवडणूक आयोगाच्या (Election Commision) या पूर्वीच्या कार्यक्रमानुसार सुरुवातीला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका नोव्हेंबर अखेरपर्यंत होणार होत्या. मात्र, मध्येच राज्यातील आठ ते दहा जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने निवडणूक कार्यक्रमात बदल करण्यात आला असल्याचे समजते.

Election Commission
Uddhav Thackeray: अमित शाहंना पुन्हा अ‍ॅनाकोंडाची उपमा; शोलेतील डायलॉग सांगत उद्धव ठाकरेंचा जनतेला इशारा

नगरपालिकांची निवडणूक आधी होणार आहे. नोव्हेंबरअखेर एकाच दिवशी मतदान होईल, असेही समजते. निवडणुकीची घोषणा 7 नोव्हेंबरनंतर होणार असल्याने आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.नगरपालिका व नगरपंचायतीसाठीची अंतिम मतदार यादी 31ऑक्टोबरला जाहीर करण्यात आली आहे तर 7 नोव्हेंबरला मतदान केंद्राची यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदान केंद्राची यादी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुक आयोगाकडून कार्यक्रमाची घोषणा होणार आहे.

Election Commission
Raj Thackeray speech : 'लाव रे तो व्हिडीओ'नंतर राज ठाकरेंचा 'काढ रे तो पडदा' : दुबार मतदारांचे आकडे सांगत थेट पुरावाच दिला

दुसरीकडे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार होती. मात्र, त्याला 15 दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ही यादी 15 दिवसांची मुदतवाढ मिळाल्यामुळे, 12 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल. ही मुदतवाढ मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी आणि त्यातील दुबार नावे वगळून अचूक यादी तयार करण्यासाठी देण्यात आली आहे.

Election Commission
BMC election plan: उद्धव ठाकरेंनी भाजपची झोप उडवली; मोर्चाच्या प्रचंड प्रतिसादानंतर मुंबईसाठी खास रणनीती तयार!

राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाचवेळी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि यंत्रणा लागणार असल्याने पहिल्या टप्प्यात महापालिका वगळता अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे सूतोवाच राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वीच दिले आहेत. त्यामुळ येत्या आठवड्याभरात या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. नगरपालीका व झेडपीच्या निवडणुकांसाठी लागलेली महापालिकांमध्येही आचारसंहिता लागणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Election Commission
Local Body Election : लागा तयारीला! बुधवारपासून आचारसंहिता, 15 डिसेंबरला जिल्हा परिषदेसाठी मतदान, तर महापालिका...; मोठ्या नेत्याने तारीखच जाहीर केली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com