

Pune News: महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार अशी हुरुहूर इच्छुकांना लागली आहे. कोर्टाने जानेवारीमध्ये निवडणुका घ्याव्या, असा आदेश दिला असला तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये या निवडणुका पुढे ढकलल्या जाणार असल्याचं जवळपास निश्चित मानले जात आहे. अशातच निवडणूक आयोग कोर्टामध्ये एक महत्त्वपूर्ण माहिती देणार असल्याचे समोर आले आहे.
राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका 31 जानेवारीच्या आधी घ्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत; परंतु या निवडणुका न्यायालयाने घालून दिलेल्या मुदतीत होण्याची शक्यता आता मावळली आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ह्या निवडणुका घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये विनंती अर्ज आयोगाकडून सादर केला जाण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाने आज प्रशासनाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महानगरपालिकांची मतमोजणी, त्यावेळी अपेक्षित असलेली कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती, याबरोबरच जिल्हा परिषद निवडणुकांच्या संभाव्य तारखांची चर्चा होईल. या चर्चेदरम्यान अधिकाऱ्यांकडून महापालिका निवडणुकांनंतर लगेचच जिल्हा परिषद निवडणुका घेणे शक्य होईल काय, याबाबत विचारणा केली जाण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या महापालिकांच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने जिल्हा परिषद निवडणुका फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र, हे करत असताना राज्य निवडणूक आयोगाला जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम त्याचे वेळापत्रक ठरवूनच सर्वोच्च न्यायालयात सादर करावे लागेल. या दृष्टीनेदेखील आयोगाने तयारी सुरू केली आहे.
सध्या महापालिकांच्या निवडणुका सुरू आहे. त्यात अधिकारी, कर्मचारी गुंतलेले आहेत. महापालिका निवडणुका जिथे होत आहेत आणि तिथे जिल्हा परिषदेच्या निवडणुका घ्यायच्या झाल्या तर मनुष्यबळाची आणि मतदान यंत्रांचीदेखील कमतरता भासेल, असे मुद्दे आयोगाकडून उपस्थित केले जात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.