ZP Teachers Transfers : ZP शिक्षकांच्या बदल्यांबाबत मोठा निर्णय, '...तर अपील करता येणार नाही'

Transfers Appeals Teachers : बदलीचे आदेश मिळाल्यानंतरही अनेक शिक्षक नवीन ठिकाणी रुजू न होता फेरबदलीसाठी अपील करतात. त्यामुळे ग्रामविकास विभागाने मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Teacher transfers
Teacher transfers Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Teachers News : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांमधील अनिश्चितता, विलंब आणि वारंवार होणारे वाद टाळण्यासाठी ग्रामविकास विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बदली आदेशानुसार नवीन शाळेत रुजू न होता फेरबदलीसाठी अपील करणाऱ्या शिक्षकांचे निवेदन आता विचारात घेतले जाणार नाही.

बदलीच्या ठिकाणी प्रथम रुजू झाल्यानंतरच फेरबदलीच्या मागणीवर सुनावणी होणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

या निर्णयामुळे बदली प्रक्रियेला शिस्त लागण्यासह विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यास मदत होणार आहे. राज्यात जिल्हा परिषदांच्या सुमारे ६२ हजार १०५ प्राथमिक शाळा असून, त्यामध्ये दोन लाख ३६ हजारांहून अधिक शिक्षक कार्यरत आहेत.

बदल्यांमधील राजकीय हस्तक्षेप रोखण्यासाठी गेल्या आठ-दहा वर्षांपासून ऑनलाइन पद्धतीने बदली प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र, बदलीचे आदेश मिळाल्यानंतरही अनेक शिक्षक नवीन ठिकाणी रुजू न होता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे फेरबदलीसाठी अपील करतात.

या अपिलांवर अपेक्षित ३० दिवसांत निर्णय न झाल्यास शिक्षक रुजू होण्यास विलंब करतात. परिणामी, संबंधित शाळांमधील अध्यापनावर परिणाम होतो. या समस्येवरून मागील वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिकाही दाखल झाली होती.या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने नवीन शासन निर्णयाद्वारे भूमिका स्पष्ट केली आहे.

Teacher transfers
Teacher Transfer : शिक्षकांच्या बदलीचा मार्ग मोकळा, शिक्षण आयुक्तांचे आदेश, प्रस्ताव रखडवणाऱ्यांवर कारवाई होणार

नवीन निर्देश काय?

- बदली झाल्यानंतर प्रथम नवीन शाळेत रुजू होणे

- बंधनकारक रुजू झाल्यानंतरच फेरबदलीच्या तक्रारी किंवा अपिलांचा विचार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ३० दिवसांत तक्रारीवर निर्णय घेणे आवश्यक

- निर्णयाविरोधात विभागीय आयुक्तांकडे सात दिवसांत अपील करता येणार

- बदली आदेशाला स्थगिती नसल्यास अपील प्रलंबित असल्याचे कारण देऊन रुजू होण्यास टाळाटाळ करता येणार नाही

- पाच वर्षांनंतर बदलीस पात्रता

Teacher transfers
Teacher Senior PAY Scale Bribe : शिक्षिकेच्या पगारवाढीवर संस्थाचालकांचा डल्ला? 50 हजारांची लाच घेताना मुख्याध्यापक जेरबंद

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.