मुंबई : "गिते हे चुकीचे काय बोलले? त्यांनी तर खरेच सांगितले. ते (गिते ) म्हणाले, 'शिवसेना-काँग्रेस यांची नैसर्गिक आघाडी,युती होऊ शकत नाही..' शिवसेनेचे माजी खासदार अनंत गिते यांच्याच शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गिते यांच्या विधानाचे समर्थन केले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावरील आपोपांबाबत पटोले यांनी 'ब्र' ही काढला नाही.
ठाकरे सरकार आणि भाजप नेत्यांमधील वाद, ईडीची कारवाई सरकारमधील धूसफूस याबाबत पटोले यांनी आपली भूमिका मांडली. तेव्हाच, गिते यांच्या आरोपांबाबत विचारले असता, गिते यांची भूमिका योग्यच असल्याचे सांगितले. त्यानंतर मात्र गिते यांच्या पहिल्या वाक्याशी म्हणजे, शिवसेना, काँग्रेस यांची नैसर्गिक नसल्याबाबत सहमत असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार यांच्यावरील आरोपांसंदर्भात प्रतिक्रिया देणे जाणीवपूर्वक टाळले.
पटोले म्हणाले, "महागाई आणि अन्य महत्त्वाच्या प्रश्नांवरून लोकांना विचलित करण्यासाठी किरीट सोमय्यासारखी मंडळी तयार केली आहेत. ही भाजपची चाल आहे. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांत साधू-संतांच्या हत्या वाढल्या आहेत. उत्तर प्रदेशातील आखाडा परिषदेचे महंत नरेंद्रगिरी यांच्या मृत्युचे प्रकरण गंभीर असून, ही असल्याचा आरोप होत आहे, अशा घटनांमुळे उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करावी."
सध्या राज्यात आरोप-प्रत्यारोपांत लोकांचे प्रश्न बाजुला फेकले गेल्याची कबुली, पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिली. अशा स्थितीती काँग्रेसने विद्यार्थी आणि महिला अत्याचाराकडे लक्ष वेधल्याचे त्यांनी सांगितले. "तमिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रात 'नीट'बाबत निर्णय घेण्याची मागणी पटोले यांनी केली. देशात १६ लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात, मात्र त्यात गैरव्यवहार वाढले आहे. पेपर 'लिक' होण्याच्या घटना घडत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.