Harshvardhan Patil News : हर्षवर्धन पाटलांनी थेट दिल्लीच गाठली ; केंद्रीय मंत्री गडकरींकडे केली 'ही' तक्रार

Political News : पालखी मार्गाच्या निकृष्ट कामाबाबत जनतेच्या अनेक तक्रारी येत आहेत...
Harshvardhan Patil News
Harshvardhan Patil News Sarkarnama
Published on: 
Updated on: 

संतोष आटोळे

Indapur : जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम हे निकृष्ट दर्जाचे सुरू असून या कामाची चौकशी करून संबंधित जणांवर कारवाई करण्याची मागणी माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

दिल्ली येथे हर्षवर्धन पाटील(Harshvardhan Patil) यांनी बुधवारी (दि.14) रोजी मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या दर्जाहीन कामाबरोबरच विविध विषयांवरही चर्चा केली. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशन नवी दिल्लीच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे उपस्थित होत्या.

Harshvardhan Patil News
Pimpri-Chinchwad: पिंपरी पालिकेचा दणका; थकबाकीदारांच्या शंभर जप्त मालमत्तांचा करणार लिलाव !

हर्षवर्धन पाटील यांनी यासंबंधीचे निवेदन मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांना दिले. त्यात या भेटीमध्ये पालखी मार्गाचे काम निकषानुसार गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे, निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी व मार्गाचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा अशी चर्चा झाली.

पालखी मार्गाच्या निकृष्ट कामाबाबत जनतेच्या अनेक तक्रारी येत आहेत. संत तुकाराम महाराज पालखी मार्गा(Sant Tukaram Maharaj Palkhi Marg)च्या कामाची गडकरी यांनी स्वतंत्रपणे दौरा काढून पाहणी करावी, शेतकऱ्यांना भूसंपादनाची रक्कम मिळणेसाठी वाद वादविवादाचे दावे लवकर निकाली काढण्यात यावेत या संदर्भातही पाटील यांनी गडकरी यांच्याशी चर्चा केली.

Harshvardhan Patil News
Ahmednagar Politics: नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठं खिंडार; घनशाम शेलारांचा 'बीआरएस'मध्ये प्रवेश

कामाच्या ठिकाणी फलक व इतर रस्ता सुरक्षिततेच्या नियमांचे कंत्राटदारांकडून पालन केले जात नसल्याने सतत अपघात होऊन अनेकांना जीव गमावावे लागले आहेत. पालखी मार्गाच्या अपूर्ण कामांमुळे जनतेची गैरसोय होत आहे. त्यामुळे पालखी मार्गाची गुणवत्तापूर्ण अशी कामे वेळेत पूर्ण व्हावीत, अशी मागणीही मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी केली.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com