

राजेंद्र त्रिमुखे :
Hindu Samaj Morcha in Ahmednagar : पाथर्डी (Pathardi News) येथे एका मुलाने एका मुलीची छेड कढुन तिला शाळेमधून पळवून नेऊन, घरामध्ये डांबून ठेवण्याचा प्रकार काल(मंगळवारी) पाथर्डी शहरात उघडकीस आला होता. या घटनेच्या निषेधार्थ आज(11 जुलै) सकल हिंदू समाजाच्या वतीने पाथर्डी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिलांसह हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. (Latest Marathi News)
काल (११ जुलै) रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कसबा या ठिकाणावरून मोर्चाला सुरुवात होऊन, घोषणाबाजी करत मोर्चा बाजारपेठ - नाईक चौक या मार्गे पाथर्डी पोलीस स्टेशन वर धडकला. यावेळी मोर्चाकरांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, घरामध्ये डांबून ठेवल्या प्रकरणी मुलाच्या आई वडिलांना सहआरोपी करा या मागणीवर मोर्चाकरांनी ठाम भूमिका घेत सुमारे एक तास ठिय्या मांडला.
दोन समाजातील हा विषय असल्याने मोर्चावेळी तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मोर्चेकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणीआरोपींवर जास्तीत जास्त कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने, मोर्चा स्थगित करण्यात आला.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे, पप्पू पालवे, माजी नगरसेवक रामनाथ बंग, युवा नेते अमोल गर्जे, नगरसेवक महेश पाटील बोरूडे, ॲड प्रतिक खेडकर, महादेव धायतडक, संघर्ष महिला फाउंडेशनच्या भारती आसलकर, मनसेचे अध्यक्ष संतोष जिरेसाळ, युवा सेनेचे अध्यक्ष सचिन नागपूरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख भगवान दराडे, गोरक्ष ढाकणे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात नगर, कर्जत, शेवगाव, अकोले, संगमनेर, पारनेर, श्रीगोंदा, श्रीरामपूर आदी ठिकाणी लव्ह-जिहाद किंवा इतर कारणास्तव धार्मिक संघर्ष पुढे आलेला आहे. यातून जिल्ह्यामध्ये दोन समाजात धार्मिक वातावरण तणावाचे झाल्याचे दिसून येत आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी तीन दिवसांपूर्वीच, तसेच नगर शहरात मागील दोन महिन्यांपूर्वी स्वतः नेतृत्व करत हिंदू आक्रोश मोर्चात उपस्थितीती लावली होती. या मोर्च्यांना सकल हिंदू समाजातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दिसून आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.