Vedanta-Foxconn प्रकल्पाबाबत बैठकीचे इतिवृत्तच टि्वट करीत ठाकरेंचा सामतांवर हल्लाबोल

Aaditya Thackeray : वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने काही दिवसांपासून उदय सामंतांना विरोधकांनी धारेवर धरले आहे.
 Vedanta-Foxconn latest news
Vedanta-Foxconn latest newssarkarnama
Published on
Updated on

पुणे : शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख, माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे आज कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांच्या निष्ठा यात्रेचा तिसरा टप्पा आजपासून (शुक्रवार)सुरु होत आहे. (Vedanta-Foxconn latest news)

वेदांता प्रकल्पावरुन (vedanta foxconn project) सध्या राज्यातील राजकारण पेटलं आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यावर टीका केली आहे. आज ठाकरेंनी टि्वट करीत पुन्हा एकदा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत सरकारच्या उच्चस्तरीय बैठकीचे इतिवृत्तच टि्वट केले.

ठाकरेंनी टि्वट करत राज्याच्या वाट्याचा प्रकल्प गुजरात गेल्यावरून सत्ताधार्‍यांना लक्ष्य करत असताना शिंदे फडणवीस सरकारच्या बैठका झाल्या तरीही प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेलाच कसा? असा सवाल त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.उदय सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे. वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने काही दिवसांपासून उदय सामंतांना विरोधकांनी धारेवर धरले आहे.

 Vedanta-Foxconn latest news
महंत नरेंद्र गिरींच्या खोलीत सापडलं मोठं घबाड ; ५० किलो सोनं अन् तीन कोटींची रोकड

'सरकारची 15 जुलैला सेमिकंडक्टरच्या प्रकल्पासाठी एक उच्च स्तरीय समितीसोबत बैठक झाली त्यामध्ये सोयी-सुविधांची चर्चा झाली. त्यानंतर 25-26 जुलैला विधिमंडळात दावा झाला, मीडीयाला वेदांताचा प्रकल्प राज्यात येणार असल्याची माहिती दिली मग तरीही प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला यामधून लाखभर रोजगाराच्या संधी गेली,' असे ठाकरे यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

सध्या महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचे प्रकल्प गमावल्याने बेरोजगारी वाढवल्याचं सांगत युवासेनेने उदय सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विविध ठिकामी सह्यांची मोहिम राबविण्यात येत आहे. 'महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाची चर्चा झाली. एमओयू झाला, जागा देण्यात आली होती,' असा दावा तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com