Aaditya Thackeray On Worli Hit And Run Case : मिहीर शाह याच्या घरावर बुलडोझर चालवणार का? आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना ललकारलं

Worli Hit And Run Case Update : आदित्य ठाकरे यांनी विधानसभेच्या सभागृहात वरळी अपघातावरुन पुन्हा एकदा रौद्ररुप धारण केले आहे.
Aaditya Thackeray, Eknath Shinde
Aaditya Thackeray, Eknath ShindeSarkarnama

Mumbai News : पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शेकार अपघातानंतर आता मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या हिट अँड रन प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. पावसाळी अधिवेशनात या अपघाताचा मुद्दा उचलून धरत विरोधक सत्ताधारी पक्षावर अक्षरश: तुटून पडले. माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी तर वरळी येथील अपघात नसून खूनच असल्याचा आरोप करत वातावरण चांगलंच तापवलं आहे.

त्यानुसार कारवाई झाली पाहिजे,अशी मागणीही त्यांनी केली.आता त्यांनी या हिट अँड रन प्रकरणांमध्ये मुख्य आरोपी मिहीर शाह याच्या घरावर मुख्यमंत्री बुलडोझर चालवणार का? असा खडा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना केला आहे.

आरोपी मिहीर शाह हा शिवसेना शिंदे गटाचा उपनेता राजेश शाह यांचा मुलगा आहे.अपघातानंतर तो तिथून पसार झाला होता. 60 तासानंतर मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती. याचवेळी शाह याला मदत करणाऱ्या 12 जणांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतर विरोधक आणखीनच आक्रमक झाले आहेत.

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी विधानसभेच्या सभागृहात वरळी अपघातावरुन पुन्हा एकदा रौद्ररुप धारण केले आहे. वरळी हिट अँड रन केसमधील आरोपीला अटक केली असलं तरी त्याच्यावरील केस ही मर्डरची केस म्हणूनच लढवली पाहिजे,अशी मागणी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली.

Aaditya Thackeray, Eknath Shinde
Worli Hit And Run Case : वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात मोठी अपडेट! आरोपी मिहीरचे वडील राजेश शाह यांची शिवसेनेच्या नेते पदावरून हकालपट्टी

'हिट अँड रन' नव्हे तर मर्डर केस...

मी तिकडे कुटूंबाची भेट घेतली. हे इतकं भयंकर होतं की एक राक्षस च असा करू शकतो.60 तास मिहीर राजेश शाहला लपवला होता.त्याच्या घरावर मुख्यमंत्री बुलडोझर चालवणार का? राजेश शाहला पदावरून काढलं आहे, पक्षातून काढला नाही. पक्ष कुठलाही असो तुम्ही त्याच्या घरावर बुलडोझर चालवणार का? असा

आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले..?

शिवाय हे सरकार आता मिहीर शाह यांच्या घरावर बुलडोझर चालवणार का असा सवाल देखील आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. वरळी अपघात प्रकरणावर बोलत असताना आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही पीडित कुटुंबियांना भेटलो त्यांनी सांगितलेली परिस्थिती अतिशय भयानक आहे. आरोपीला अटक केली असली तरी ही केस मर्डर म्हणूनच लढवली गेली पाहिजे. अपघाताबाबत ऐकलं हे एवढं भयानक प्रकरण आहे. नरकातून राक्षसाला आणलं असतं तरी त्याने अस कृत्य केलं नसतं.साठ तास आरोपीला लपायला दिले. त्याच्या गाडीवरचं पक्षाचं चिन्ह काढलं असा खळबळजनक आरोप ठाकरे यांनी केला.

Aaditya Thackeray, Eknath Shinde
Vijay Wadettiwar News : आरक्षणाचा प्रश्न सोडवता येत नसेल तर सत्तेतून पायउतार व्हा, आम्ही निर्णय घेऊ; वडेट्टीवारांच सरकारला आव्हान

आरक्षणाबाबत त्यांच्याकडे उत्तर नाही.विरोध आमचा कशाला नाही.तिसऱ्यांदा ही बैठक बोलवली. तुम्ही लोकांसमोर जे काय ते मांडा,सभागृहात मांडा,पण हा फास आहे.समाज कुठेही फसणार नाही.आम्ही त्याला लेखी उत्तर देणार नाही,ही दादागिरी त्यांची चालणार नाही.उद्धव ठाकरे यापूर्वीच बोलले आहेत सर्वानुमते निर्णय घ्या असेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com