काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर ( Abhishek Ghosalkar ) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. फेसबुक लाइव्हमध्ये गोळीबार झाल्यानं एकच खळबळ उडाली होती. यात मॉरिसचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रानं जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात ( Mumbai Session Court ) धाव घेतल्याचं समोर येत आहे. पण, यास अभिषेक यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर ( Tejswini Ghosalkar ) यांनी विरोध दर्शविला आहे.
8 फेब्रुवारीला ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर ( Abhishek Ghosalkar ) यांच्यावर फेसबुक लाइव्हमध्ये गोळीबार करण्यात आला. मॉरिस नोरोन्हा यानं घोसाळकरांवर गोळीबार केला. यानंतर मॉरिसनेही स्वत:वर गोळ्या झाडल्या. या घटनेचे घोसाळकर आणि मॉरिसचा मृत्यू झाला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
फेसबुक लाइव्हमध्ये दोघांनी समाजासाठी एकत्र आल्याचं म्हटलं होतं. यानंतर अभिषेक घोसाळकर फेसबुक लाइव्हमध्ये बोलत असतानाच मॉरिसने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ही घटना घडल्यावर राज्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांनी मॉरिसचा सुरक्षारक अमरेंद्र मिश्राला ताब्यात घेतलं होतं.
अमरेंद्र हा मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवाशी आहे. अमरेंद्रने बंदुकीचा परवाना उत्तर प्रदेशातून काढल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याच्याकडील बंदुकीची नोंदणी मुंबईत करण्यात आली नसल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, अमरेंद्रने भाईंदर पोलिसांकडे जमा केलेला शस्त्रपरवाना खरा आहे की नाही, याची पडताळणी करायची, असं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं होतं. पण, उत्तर प्रदेश सरकारनं आपल्याला शस्त्रपरवाना दिला आहे, असं मिश्राचं मत होतं.
मॉरिसनं बंदुकीच्या बदल्यात अमरेंद्रला काही पैसे दिले होते का? अमरेंद्रनं बंदुकीच्या परवान्याची नोंद मुंबई पोलिसांकडे का केली नाही? अमरेंद्रनं त्याचं वेतन आणि अन्य बाबींची नोंद पोलिसांकडे का केली नाही? याची मुंबई पोलिस चौकशी करत आहेत.
दरम्यान, अमरेंद्र मॉरिसकडे तीन ते चार महिन्यांपासून अंगरक्षक म्हणून काम करत होता. मॉरिसने वापरलेली बंदूक अमरेंद्र मिश्राची होती. त्यामुळे अमरेंद्रला पोलिसांनी अटक केली आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.