Ajay Devgan: रियल हिरो विरोधात रील हिरो..! अजय देवगनची हायकोर्टात धाव, पण तुकाराम मुंढे कारवाईवर ठाम

Ajay Devgan: पान मसाल्याची जाहिरात करणाऱ्या अभिनेता अजय देवगन यांनी एफडीएच्या कारवाईविरोधात थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.
Ajay Devgan_Tukaram Mundhe
Ajay Devgan_Tukaram Mundhe
Published on: 
Updated on: 

Ajay Devgan Vimal Pan Masala Controversy: पान मसाल्याची जाहिरात करणाऱ्या अभिनेता अजय देवगन यांनी एफडीएच्या कारवाईविरोधात थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. याची माहिती खुद्द तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली. देवगन हे कोर्टात गेलेले असले तरीही या संदर्भातील कारवाई सुरुच राहणार असल्याचा स्पष्ट इशारा मुंढे यांनी दिला आहे. पण हे प्रकरण नेमकं काय आहे?

अन्न व औषध प्रशासन विभागाचे अर्थात एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात धडाकेबाज कारवाया सुरु केल्या आहेत. नियमांचं उल्लंघन करणारी अन्न पदार्थांची विक्री करणारी दुकानं, हॉटेल्स, औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या यांचे परवाने रद्द करण्याचा धडका त्यांनी लावला आहे. त्याचबरोबर राज्यात गुटखाबंदी असतानाही पान मसाल्यांच्या नावाखाली याची सर्रासपणे विक्री सुरु आहे. विशेष म्हणजे बॉलिवूड कलाकारांकडून या पान मसाल्याच्या जाहिराती केल्या जात आहेत. त्यामुळं याला प्रोत्साहन देणाऱ्या या कलाकारांवरही कारवाई व्हायला हवी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत होती. त्याची गंभीर दखल घेत अखेर तुकाराम मुंढे यांनी या कालाकारांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.

Ajay Devgan_Tukaram Mundhe
'मोदींच्या पंतप्रधानपदाचा मार्ग कोणी मोकळा केला? भाजपमधील कोणत्या नेत्यांनी दिली साथ, कोणाचा होता विरोध?'

तुकाराम मुंढेंनी काय सांगितलं?

'विमल पान मसाला' वादावर भाष्य करताना एफडीए (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे म्हणाले,"...ज्या व्यक्तींची नावे समोर आली आहेत, त्यापैकी अजय देवगण यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, आम्ही या प्रकरणातील कार्यवाही सुरू ठेवली आहे. आम्ही कारवाई सुरू करून 'विमल'ची जाहिरात करणाऱ्या तिन्ही कलाकारांना नोटीस बजावली होती, तिन्ही व्यक्तींनी त्याला प्रतिसाद देत वेळ मागून घेतली होती. सक्षम प्राधिकारी असलेल्या सहाय्यक आयुक्तांनी कार्यवाही पूर्ण करून सुनावणी बंद केली आहे. आता हे प्रकरण निर्णयासाठी सक्षम प्राधिकारी असलेल्या सहआयुक्तांकडे सोपवण्यात आले आहे. पण आता संबंधित व्यक्तींपैकी एक, अजय देवगण यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे"

नेमकं प्रकरण काय?

शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ हे ‘विमल इलायची’ (मुख्यतः माउथ फ्रेशनर/इलायची उत्पादनाची) जाहिरात करतात. FDAच्या मते, ही जाहिरात ‘विमल पान मसाला’ या प्रतिबंधित ब्रँडची छुपी/अप्रत्यक्ष (सरोगेट) जाहिरात आहे. ब्रँडचे नाव, रंगसंगती, स्टाईल इत्यादींमुळं पान मसाला ब्रँडशी संबंध निर्माण होतो आणि त्यामुळं नियमांचं उल्लंघन होतं, असा आरोप आहे.

ऑगस्ट २०२६ मध्ये FDA ने या तीन अभिनेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. त्यांना जाहिरात थांबवण्यास, स्पष्टीकरण देण्यास आणि कायदेशीर जबाबदारीबाबत उत्तर देण्यास सांगितलं. उल्लंघन सिद्ध झाल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा इशाराही दिला होता. ही दंडाची रक्कम १० लाख रुपयांपर्यंत आहे. दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं की, सेलिब्रिटी असोत वा इतर कोणी, कायदा सर्वांसाठी समान आहे. आपल्यासाठी हे कलाकार केवळ जाहिरातदार आणि कायद्याचे संभाव्य उल्लंघन करणारे आहेत. कंपनी, उत्पादक आणि विक्रेत्यांवरही कारवाई सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं होतं.

Ajay Devgan_Tukaram Mundhe
Chandrashekhar Bawankule: नागपूरमध्ये भाजपला पक्षातूनच दगाफटका? 8500 मतपत्रिकांवरील ‘2’च्या घोळामुळे संशय; बावनकुळेंनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली!

वादाची सध्याची स्थिती

या सरोगेट जाहिरात प्रकरणाचा तपास FDA ने पूर्ण केला असून अभिनेत्यांनी नियमांचं उल्लंघन केल्याचं यात आढळून आलं आहे. त्यामुळं हे प्रकरण आता सुनावणीसाठी जाईल. दरम्यान, यातील तीन कलाकारांपैकी एक अजय देवगण यांनी FDAच्या नोटिशीविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याची सुनावणी नोव्हेंबर २०२६मध्ये होण्याची शक्यता आहे. पूर्वी विमल पान मसाला विकणाऱ्या मूळ कंपनीने दिल्ली हायकोर्टातही याचिका दाखल केली होती, पण ती फेटाळ मुंबई हायकोर्टात जाण्याचा सल्ला कंपनीला देण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.