Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंची दिशा सालियन मृत्यू प्रकरणात SIT चौकशी?

SIT to Investigate Shiv Sena Leader Aaditya Thackeray : दिशा सालियनच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप झाले होते...
Aaditya Thackeray, Disha Salian, Devendra Fadnavis
Aaditya Thackeray, Disha Salian, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Aaditya Thackeray Disha Salian Case : ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण दिशा सालियन मृत्यूची एसआयटी चौकशी होणार असून, या प्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी केली जाणार असल्याचीही माहिती मिळत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंना घेरण्याची सत्ताधाऱ्यांची पूर्ण तयारी झाल्याची जोरदार चर्चा आहे.

विशेष म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरेंच्या चौकशीची चर्चा सुरू झाल्याने काही महत्त्वांच्या राजकीय घडामोडीचे संकेत मिळत आहेत. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंवर वारंवार आरोप होत होते. भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी तर त्यांच्याकडे या प्रकरणी पुरावे असल्याचे दावे अनेकदा केले होते.

Aaditya Thackeray, Disha Salian, Devendra Fadnavis
Mumbai News : नव्या निविदेत 308 कोटी कमी कसे झाले? BMC च्या निविदेवरून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर रोख

दरम्यान, आदित्य ठाकरेंची चौकशी अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली होण्याची शक्यता आहे. वर्षभरापूर्वी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली होती. प्रत्यक्षात एसआयटी चौकशीबाबत आज आदेश निघण्याची शक्यता सांगितली जाते.

चौकशीला घाबरता कशाला? - गिरीश महाजन

आदित्य ठाकरेंनी काहीही केले नसेल तर त्यांनी चौकशीला घाबरण्याचे कारण काय? असा सवाल मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी प्रतिक्रिया देताना केला.

दूध का दूध, पानी का पानी - अंबादास दानवे

सरकार सूडबुद्धीने वागत असून, आदित्य ठाकरेंना गुंतवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, यापूर्वी चौकशी झाली असून त्यातून काहीही साध्य झालेले नाही, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. दूध का दूध आणि पानी का पानी यापूर्वीच सिद्ध झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय आहे प्रकरण?

दिशा सालियन ही अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची मॅनेजर होती. तिचे 8 जुलै 2020 रोजी 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर तिचा मृत्यू पडून झाला नसून तिची हत्या केल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणात आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर आठवडाभरात म्हणजे 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांतसिंह याने राहत्या घरी आत्महत्या केली होती. तेव्हाही सुशांतसिंह याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत होता.

सीबीआयचा निष्कर्ष

वास्तविक सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआयने दिशा सालियनच्या मृत्यूचाही तपास केला होता. त्यावेळी दिशाचा मृत्यू इमारतीवरून तोल जाऊन पडल्यामुळे झाल्याचा निष्कर्ष सीबीआयने काढला होता, पण सीबीआयने दिशा सालियन मृत्यू प्रकरणात वेगळा गुन्हा दाखल केला नव्हता. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. दिशाचा मृत्यू झाला तेव्हा आदित्य ठाकरे कुठे होते ? असा प्रश्न तेव्हापासून विचारला जात होता.

राणेंचे आरोप अन् राणेंविरोधात तक्रार

भाजप नेते नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरेंवर अनेक आरोप केले होते. त्यानंतर दिशाच्या पालकांनी राणे पिता-पुत्रांविरोधात तक्रार केल्यानंतर नारायण राणेंना चौकशीसाठी मालवणी पोलिस ठाण्यात बोलावले होते.

Aaditya Thackeray, Disha Salian, Devendra Fadnavis
Aaditya Thackeray: दुबईतील जागतिक हवामान परिषदेत आदित्य ठाकरेंनी वेधलं लक्ष, पाहा खास फोटो...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com