Worli Crime News: आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात नारळी पोर्णिमेलाच राडा,आमदार पुत्र अडचणीत; अदखलपात्र गुन्हा दाखल

Aaditya Thackeray News: वरळी कोळीवाड्यातील गोंधळ आणि धक्काबुक्की प्रकरणी सिद्धेश शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याप्रकरणी आपली प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदेंना डिवचलं आहे.
worli koliwada rada.jpg
worli koliwada rada.jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे दोघेही नारळी पौर्णिमेनिमित्तानं एकाच वेळी वरळीतील कोळीवाड्यात गेले होते. यावेळी शिंदे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.यामुळे काहीवेळ तिथे तणाव निर्माण झाला.आता वरळीतील झालेल्या राड्यानंतर आदित्य ठाकरेंचे (Aaditya Thackeray) निकटवर्तीय आणि आमदार सुनील शिंदें यांच्या मुलगा असलेल्या सिद्धेश शिंदे यांच्याविरोधात दादर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाच्या तक्रारीनंतर सिद्धेश शिंदे यांच्याविरोधात शनिवारी (ता.9) अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमावेळी झालेल्या गर्दीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारीला धक्का मारल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेना महिला शाखाप्रमुखाच्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील शिंदे यांचे चिरंजीव व युवासेनेचे सदस्य असलेल्या सिद्धेश शिंदेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या संबंधित तक्रारदार महिलेवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीत गेलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिंदेंच्या कार्यकर्त्यांनीही जशास तसं प्रत्युत्तर दिलं.

worli koliwada rada.jpg
Devendra Fadnavis News: राहुल गांधींनंतर शरद पवारांचाही निवडणूक प्रक्रियेवर संशय; फडणवीसांचा 'पळपुटे' उल्लेख करत जोरदार पलटवार

यावेळी पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीनं शिवसेनेच्या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात आली. सिद्धेश शिंदे यांच्यावर दादर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या शाखाप्रमुख महिलेनं प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या,ज्यावेळी खाली येत होतो, त्यावेळी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आमच्याविरोधात गद्दार अशी घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर गर्दीमध्ये माझ्या पाठीत कुणीतरी मारलं. मी मागे पाहिलं त्यावेळी तो सिद्धेश शिंदे होता. त्याने नंतर मला एक पंच मारला, त्यामुळे मला काही समजले नाही.

worli koliwada rada.jpg
Jitendra Awhad News: शरद पवारांच्या खळबळजनक दाव्यानंतर काही तासांतच आव्हाडांची सरन्यायाधीश गवईंकडे मोठी मागणी

वरळी कोळीवाड्यातील गोंधळ आणि धक्काबुक्की प्रकरणी सिद्धेश शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याप्रकरणी आपली प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदेंना डिवचलं आहे. ते म्हणाले, हा शिंदेंचा रडीचा डाव आहे. राजकीय सत्तेचा वापर करत आपल्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोपही ठाकरेंनी यावेळी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com