Gunratna Sadawarte News : अ‍ॅड. सदावर्ते दाम्पत्याचं एसटी बँक संचालकपद रद्द; सहकार खात्याने ठेचले...

Adv Gunratna Sadawarte ST Bank News : "सदावर्ते यांच्याकडून वार्षिक सर्वसाधारण सभेत बेकायदेशीर विषय आणले गेले. जे पोटनियम बदलायचे होते, त्याची माहिती त्यांनी सभासदांना दिली नाही."
Gunratna Sadawarte News
Gunratna Sadawarte NewsSarkarnama

Mumbai News : अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याने एक मोठा दणका दिला आहे. एस टी बँकेतलं संचालक पद सदावर्ते दाम्पत्याचं रद्द करण्यात आले आहे. सदावर्ते दाम्पत्य यापुढे तज्ज्ञ संचालक म्हणून कार्यरत राहू शकणार नाहीत, असा निर्णय दिला गेला आहे. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी यासंदर्भात सहकार आयुक्ताकडे तक्रार दिली होती. (Latest Marathi News)

ज्या वेळेपासून सदावर्ते दाम्पत्याकडे ही बँकेवर संचालकपदी आले. तेव्हापासून ते चर्चेत राहिले होते. ते संचालक असून अनेकदा कार्यकरिणीत गैरहजर राहिले, अशी अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये या दाम्पत्याविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीनुसार आता सहकार विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे आता हे संचालक पद रिक्त झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Gunratna Sadawarte News
State Govt : राज्य सरकारने दिली 'या' निवडणुकांना स्थगिती; सहकार पणन विभागाने काढले आदेश...

तक्रारदार संदीप शिंदे यांनी यासंदर्भात माध्यमांकडे प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे म्हणाले, "जेव्हापासून सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांची सत्ता एसटी सहकारी बँकेवर आली, तेव्हापासून त्यांनी ही बँक खड्ड्यात घालण्याचं काम केलं आहे, असे लोकांना वाटत आहे."

Gunratna Sadawarte News
Jalna Loksabha Constituency : जालना-संभाजीनगरात दानवे-भुमरेंचे 'एकमेका सहाय्य करू'ची भूमिका!
Gunratna Sadawarte News
Gunratna Sadavarte News : जरांगे सागर बंगल्याकडे रवाना होताच सदावर्ते आक्रमक; म्हणाले, "लोकांना भडकवण्याचा...."

शिंदे म्हणाले, "एसटी कामगार अत्यंत हवालदिल झालेला आहे. गेली आठ महिने आम्हाला कर्ज मिळत नाही. अशातच सदावर्ते यांच्याकडून वार्षिक सर्वसाधारण सभेत बेकायदेशीर विषय आणले गेले. जे पोटनियम बदलायचे होते, त्याची माहिती त्यांनी सभासदांना दिली नाही. याची तक्रार मी कामगारांच्या वतीने सहकार आयुक्तांकेडे केली होती. याची दखल घेऊन आता आयुक्तांनी ही कारवाई केली आहे." (Latest Marathi News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com