तुरुंगातून 19 दिवसांनी सुटका झाली अन् सदावर्तेंनी पुन्हा एकदा राज्य सरकारला डिवचलं

गुणरत्न सदावर्ते यांना ८ एप्रिलला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं
Gunratan Sadavarte Latest Marathi News
Gunratan Sadavarte Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratan Sadavarte) यांच्या विरोधात महाराष्ट्रात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हल्ल्याच्याच दिवशी ८ एप्रिलला सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. उच्च न्यायालयाने काल (ता.26) सदावर्ते यांना जामीन मंजूर केल्यामुळे त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. यानंतर सदावर्तेंनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. (Gunratan Sadavarte Latest Marathi News)

तुरुंगातून सुटताच सदावर्ते यांनी राज्यात आज आणीबाणीची स्थिती असल्याचा आरोप केला आहे. यामुळे त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारशी पंगा घेतल्याचे समोर आले आहे. आणीबाणीचा आरोप करीत त्यांनी महाविकास आघाडी सरकारला डिवचलं आहे. ते म्हणाले की, राज्यात आता आणीबाणीची स्थिती आहे. आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत. याचबरोबर आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पाईक आहोत. राज्य सरकारनं आपल्या वागण्याचा थोडा तरी विचार करावा आणि कष्टकरी समाजाला सरकारने समजून घ्यावं.

Gunratan Sadavarte Latest Marathi News
स्वत:ला मर्द म्हणता ना! सत्तारांना पुढं करून नितेश राणेंचं थेट मुख्यमंत्री ठाकरेंना आव्हान

तुरुंगातून सुटका होताच सदावर्ते यांनी काल (ता.26) घोषणाबाजी केली होती. ते म्हणाले होते की, हम है हिंदुस्थानी, भारताच्या संविधानाचा हा विजय आहे. भारताच्या संविधानापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. माझी मुलगी झेन सदावर्ते आणि माझी पत्नी जयश्री पाटील यांच्यासोबत राहून माझ्या मित्र परिवाराने या अन्यायाविरुद्ध मला सोबत दिली. महाराष्ट्रातल्या देशातल्या हिंदुस्तानी कष्टकरी स्वागताला आले आहेत. तो आमचा पुढचा केंद्रबिंदू असेल. या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे करता येईल ते सर्व आम्ही करु.

Gunratan Sadavarte Latest Marathi News
राणे तोंडघशी! बालेकिल्ल्यातच त्यांना अन् भाजप कार्यकर्त्यांना गावबंदी

दरम्यान, सदावर्ते यांच्यावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये मुंबई, सातारा, कोल्हापूर येथील गुन्ह्यात सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. कोल्हापूर पोलिसांच्या कोठडीची सोमवारी संपल्यानंतर सदावर्ते यांची मुंबईतील आर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात आली होती. सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असता न्यायालयाने दिलासा देत जामीन मंजूर केला. त्यामुळे 19 दिवसानंतर सदावर्ते यांची सुटका झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com