मुंबई : हनुमान चालिसावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी आंदोलन करणारे खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) हे सध्या तुरुंगात आहेत. आता या वादात भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उडी घेतली आहे. त्यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना व्हिडीओ ट्विट करीत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आव्हान दिलं आहे.
आता नितेश राणेंनी शिवसेना नेते व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. हा वादग्रस्त व्हिडीओ 2017 मधील आहे. सत्तार यांनी भगवान हनुमानाला शिवीगाळ केल्याचा दावा राणेंनी केला आहे. या व्हिडीओत सत्तार हे पोलिसांच्या उपस्थितीत वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. यावरून राणेंनी थेट मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, स्वत:ला मर्द म्हणता ना, मग या अब्दुल सत्तारला तुरुंगात डांबून दाखवा, असं आव्हानही राणेंनी मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
दरम्यान, दलित असल्यामुळे तुरुंगात हीन दर्जाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप नवनीत राणांनी केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत त्यांनी थेट लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले होते. या पत्रावर लोकसभा सचिवालयाने केंद्रीय गृहमंत्रालयाला आदेश देऊन 24 तासांत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. लोकसभा सचिवालयानं याबाबत महाराष्ट्र सरकारकडे माहिती मागितली होती. नवनीत राणांच्या आरोपांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही जाहीर पत्रकार परिषदेत दुजोरा दिला होता. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मात्र, राणांच्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे जाहीर केले आहे.
राणा दांपत्याला 23 एप्रिलला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना 24 एप्रिलला त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांच्यावर आणखी काही गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी विविध मुद्दांवर पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने राणा 14 दिवसांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर राणा दांपत्याच्या वकिलांनी लगेच जामिनासाठी अर्ज केला. पण न्यायालयाने त्यावर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला. या अर्जावर 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. त्यानंतर राणा दापत्यानं सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सत्र न्यायालयानेही राणा दांपत्याला तातडीनं जामीन देण्यास नकार देत 29 एप्रिला सुनावणी घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.