Maharashtra Politics : शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर आता पुढचा नंबर काँग्रेसचा..? शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

Shivsena Political News : '' तुम्ही बघताय ज्या गोष्टी कधी लोकांच्या डोक्यात पण नाहीये, त्या गोष्टी राज्यात घडत आहेत...''
Shivsena -Congress - Ncp
Shivsena -Congress - Ncp Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : मागील वर्षी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत बंडखोरी केली होती. यानंतर एक वर्षाने पुन्हा एकदा राजकीय मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अजित पवारांच्या बंडांनंतर उभी फूट पडली आहे. यानंतर आता महाराष्ट्रातील दोन मोठे पक्ष फुटल्यानंतर आता पुढचा नंबर कुणाचा याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. याचदरम्यान, आता शिवसेनेच्या एका नेत्यानं खळबळजनक दावा केला आहे.

शिवसेना नेते व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शनिवारी (दि.८) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोठं विधान केलं आहे. पाटील म्हणाले, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसमधील काही आमदार फुटणार आहेत. तर तेही आता सरकारमध्ये सामील होणार असल्याचं म्हटलं आहे.

Shivsena -Congress - Ncp
Karad News : दहशतीखाली भाजपकडे गेलेले पवारांची साथ सोडणार नाहीत : पृथ्वीराज चव्हाण

पाटील नेमकं काय म्हणाले..?

मंत्री गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) यावेळी म्हणाले, तुम्ही बघताय ज्या गोष्टी कधी लोकांच्या डोक्यात पण नाहीये, त्या गोष्टी राज्यात घडत आहेत. त्यामुळे आपण काहीच सांगू शकत नाही असंही पाटील यावेळी म्हणाले.

तसेच काँग्रेस(Congress) पक्ष फुटण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे काही सांगता येत नाही. मी एक वेळेस नगरच्या सभेत सांगितलं होतं की, विखे पाटील आणि त्यांचे मुलगा हा भाजपकडून निवडणूक लढवेल. ते भाजपात आले. तर मी दोन महिन्यापासून आपल्याला सांगत होतो की, अजितदादा आपल्याकडे येतील ते आले. आता काँग्रेसवाले येतील ते पण बघा असा दावाच पाटील यांनी पाटील यांनी केला आहे.

Shivsena -Congress - Ncp
Sharad Pawar In Nashik : शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना 'चॅलेंज'; म्हणाले, "सर्व यंत्रणांचा वापर करून..."

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार(Ajit Pawar) यांच्यासह महत्वाचे नेतेच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होते. त्यावरून शिवसेना व राष्ट्रवादीनंतर आता भविष्यात काँग्रेसही फुटणार असा दावा शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी काहीच दिवसांच्या आधी केला आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या राज्यकीय भूकंपावरून चर्चा रंगली होती. त्याचदरम्यान आता पुन्हा एकदा शिंदे गटातील एका मंत्र्यानेच काँग्रेस फुटणार हे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com