Eknath Shinde News : ठाकरेंपाठोपाठ एकनाथ शिंदेंचा काँग्रेसला दणका; माजी नगरसेवकांचे राजीनामासत्र !

Eknath Shinde's shock to Congress : "काँग्रेसमध्ये खळबळ, राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येत असतानाच हा प्रकार घडला आहे."
Eknath Shinde News :
Eknath Shinde News : Sarkarnama

Mumbai News : ठाकरेंकडील माजी नगरसेवक फोडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी आता आपला मोर्चा काँग्रेसकडे वळवला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचा फायदा उठवून, त्यांचे माजी नगरसेवक गळाला लावण्याचे प्रयत्न शिंदेनी चालवले आहेत. (Latest Marathi News)

दुसरीकडे कुरघोडीच्या राजकारणात अडकलेल्या काँग्रेसमधील नाराजीतून तीन माजी नगरसेवकांनी राजीनाम्याचे अस्त्र उपसले आहे . त्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून, पुढील पाच दिवसांत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येत असतानाच हा प्रकार घडला आहे. राजीनामा नाट्यावरून काँग्रेसमध्ये नवे 'राजकारण' घडण्याचे चिन्हे दिसत आहेत. नगरसेवंकांनी राजीनामा दिला असून, त्यासाठी शिंदेंनी 'व्यवस्था' केल्याचेही समजते. त्यामुळे शिंदेंनी ठाकरेंनंतर आता काँग्रेस नेत्यांना घाम फेडला आहे.

Eknath Shinde News :
Ajit Pawar On Election : शिंदे-फडणवीसांसह लोकसभा, विधानसभा तर, स्थानिक स्वराज्य संस्था...; अजितदादांची मोठी घोषणा

मुंबई काँग्रेसमध्ये मागील काही दिवसांपासून अतंर्गत धुसफूस असल्याचे बोलले जात आहे. ९ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनी मुंबई काँग्रेसने आखलेल्या कार्यक्रमात अनुपस्थित राहणाऱ्या माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पक्षाकडून बजावण्यात आली होती. यानंतरच काँग्रसमध्ये नाराजी वाढल्याचे दिसून येते. परिणामी मुंबई काँग्रेसचे माजी नगरसेवक पुष्पा कोळी, गंगा माने, बबू खान यांनी राजीनामा दिले आहेत. त्याचसोबत मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी भास्कर शेट्टी यांनी पण राजीनामा दिला आहे.

काँग्रेसमधील नाराजी शिंदेंच्या पथ्यावर -

काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी ही एकनाथ शिंदेंच्या पथ्यावर पडताना दिसत आहे. शिंदे यांनी मुंबईतील ठाकरेंचे ४० ते ४५ माजी नगरसेवक फोडल्यानंतर आता त्यांनी काँग्रेसवर लक्ष केंद्रीत केले आहे. काँग्रेसमधील नेत्यांच्या अंतर्गत संघर्ष आणि कुरघोडीच्या राजकारणामुळे राजीनाम्याचे नाराजीनाट्य रंगत आहे. मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या तीन माजी नगरसेवकांचा राजीनामा आणि त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता असणे, त्यामुळे मुंबईत शिंदेंची ताकद आणखी वाढू शकते.

Eknath Shinde News :
India and China Population : भारताने चीनला मागे टाकले; ठरला जगातला सर्वाधिक लोकसंख्येचा देश

मुंबई काँग्रेसमध्ये नुकतीच झाली खांदेपालट -

जून महिन्यात मुंबई काँग्रेसमधील नुकतीच झाली खांदेपालट करण्यात आली होती. आमदार भाई जगताप यांना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते, त्यांच्या जागी माजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. काँग्रेसच्या हायकमांडने मुंबई काँग्रेसमध्ये अचानक केलेल्या या बदलामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाणही आले होते. यानंतर मुंबई काँग्रेसमध्ये सारे आलबेल नाही. काँग्रेसमध्ये अंतर्गत नेत्यांचे सुप्त संघर्ष सुरू असल्याचे बोलले जाते.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com