Ajit Pawar: अजितदादांनी किरीट सोमय्यांना कडक शब्दांत दिली समज; म्हणाले,'मशिदीत जाऊ नये,अन्यथा...

Ajit Pawar On Kirit Somaiya News : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रोहिंगे,अनधिकृत बांग्लादेशी यांच्यासह धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसंदर्भातही मुद्दा उचलून धरला होता.त्याचमुळे सोमय्या काही ठिकाणी मशिदीत जात असल्याचेही समोर आले होते.
Ajit Pawar On kirit Somaiya .jpg
Ajit Pawar On kirit Somaiya .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळं राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं.यानंतर भाजप नेते नितेश राणे आणि किरीट सोमय्या यांनीही मशि‍दींवरील अनधिकृत भोंग्यांचा मुद्दा उचलून धरल्याचं पाहायला मिळालं होतं.याचदरम्यान,आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अजितदादांनी सोमय्यांना स्पष्ट शब्दांत तंबी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बुधवारी(ता.24) अनधिकृत भोंग्याच्याविषयीची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर अजितदादांनी भाजप नेते किरीट सोमय्यांना मशि‍दींवरील भोंग्यांसंदर्भात कडक भाषेत समज दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात महायुती सरकार सत्तेत आल्यापासून धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेल्या अनधिकृत भोंगे आणि त्यामुळे होत असलेले ध्वनीप्रदूषण हा कळीचा मुद्दा ठरत आहे.याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र सरकारने ध्वनीप्रदूषणाविषयी नियमावलीही निश्चित केली आहे.

मुंबई शहरासह राज्यातील मशि‍दींवरील अनधिकृत भोग्यांचा प्रश्न पुन्हा एकदा तापण्यास सुरुवात झाली आहे. मशि‍दीवरील भोग्यांविरोधात आता कारवाईची मागणी करण्यात येत आहे. या मागणीविरोधात मुस्लिम नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे.

Ajit Pawar On kirit Somaiya .jpg
Pune BJP News: भाजप पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच चित्रा वाघ मैदानात; ट्विट करत म्हणाल्या...

याच पार्श्वभूमीवर मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील अनधिकृत भोंग्यांसंदर्भात बोलावलेल्या बैठकीला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती बैठकीला उपस्थित होते. तसेच समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी, आमदार सना मलिक, एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांसह अनेक नेतेमंडळी हजर होते.

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी रोहिंगे,अनधिकृत बांग्लादेशी यांच्यासह धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसंदर्भातही मुद्दा उचलून धरला होता. त्याचमुळे सोमय्या काही ठिकाणी मशिदीत जात असल्याचेही समोर आले होते. आता याच धर्तीवर अजितदादांनी आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली आहे.

Ajit Pawar On kirit Somaiya .jpg
Congress on Modi Government : लोकशाहीवर खतरनाक हल्ले, देशात 11 वर्षे अघोषित आणीबाणी!

अजित पवारांनी किरीट सोमय्यांना मशिदीत जाऊ नये अशी तंबी दिल्याची माहिती आहे.तसेच सोमय्यांच्या मशिदीत जाण्यामुळे मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असेही अजित पवारांनी यावेळी म्हटलं आहे.

अजित पवारांसमोरच पोलीस आयुक्तांनी मुंबईत 1500 भोंगे उतरवण्यात आल्याची माहितीही दिली. याचदरम्यान,किरीट सोमय्या हे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाणूनबुजून भोंग्यांचा विषयीचा वाद उपस्थित करत असल्याचा आरोपही समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केला आहे.

तसेच किरीट सोमय्या यांनी पोलिसांवर दबाव टाकून कारवाई केली तर कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल आणि त्याला ते स्वत: जबाबदार असतील असा इशाराही मुस्लिम संघटनांनी यावेळी दिला. याचदरम्यान,पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालक यांना नियमांची पायमल्ली करणार्‍यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. मात्र कुठेही चुकीच्या पद्धतीने कारवाई नको असं स्पष्ट शब्दात सांगितलं.

Ajit Pawar On kirit Somaiya .jpg
Satara Politic's : आमदार अतुल भोसलेंनी सांगितली महायुतीची निवडणूक स्ट्रॅटेजी; ‘जिथे महायुती शक्य नाही; तिथे मैत्रीपूर्ण लढती’

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र सरकारने ध्वनीप्रदूषणाविषयी नियमावली निश्चित केली आहे. त्यामध्ये शांतता क्षेत्रात रात्री 40 तर दिवसा आवाजाची मर्यादा 50 डेसिबल इतकी असावी. निवासी क्षेत्रात आवाजाची मर्यादा रात्री 45 तर दिवसा 55 डेसिबलपर्यंत असावी.

वाणिज्य क्षेत्रात हीच मर्यादा रात्री 55 तर दिवसा 65 डेसिबलपर्यंत आहे आणि औ‌द्योगिक क्षेत्रात आवाजाची मर्यादा रात्री 70 तर दिवसा 75 डेसिबल इतकी आहे.असे असले तरी धार्मिक स्थळांवर कायमस्वरूपी लावलेले भोंगे प्रत्यक्षात लावलेल्या ठिकाणी ही आवाजाची मर्यादा पाळत नसल्याचं समोर आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com