मुंबई : मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन आज मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परप्रांतियांना खडे बोल सुनावले. ''महाराष्ट्रात राहायचं, मराठी भाषेला विरोध करायचा हे नैतिक ढोंग काही जण करतात. इथं राज्यात येऊन प्रगती करता आणि मराठी भाषेला, माणसाला विरोध का करता,'' असा अजित पवारांनी (ajit pawar)यावेळी उपस्थित केला.
'' या मातीचे ऋण विसरू नका,'' असेही आवाहन अजित पवार यांनी केले. पवार म्हणाले, ''आपल्याच मुंबापुरीत यायचं, दोन पैसे कमवायचे, त्यानंतर आपल्या राज्यात हे पैसे पाठवायचे आणि वर मराठीला विरोध करायचा, असं करणाऱ्यांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे.
दुकानांवर मराठी भाषेचे फलक लावावे यासाठी सरकारने कायदा केला. मात्र, त्याविरोधात कोर्टात जाणाऱ्यांना अजित पवार यांनी सुनावले. ''इकडं येऊन पैसे कमावयचे आणि मराठी पाट्यांसाठी विरोध का करायचा या मातीचे ऋण विसरू नका,'' असेही आवाहन त्यांनी केले.
''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाषा मवाळ असली तरी ती गुदगुल्या करणारी आहे. कधी काही त्यांच्या भाषेतून शालजोडीही बसतात. डॉ. विश्वजीत कदम हे घरच्याच विद्यापीठातून डॉक्टर झालेत. त्यांच्यापुढे विद्यावाचस्पती विश्वजीत कदम असं लावायला हवं,'' असा टोला अजित पवार यांनी लगावला.
अजित पवार म्हणाले, ''मराठी स्वाभीमान जागृत ठेवण्यासाठी हे भवन काम करेल. मराठी भाषा संपणार नाही. मराठी माणूस जगात कुठेही गेला तरी घरात मात्र मराठीतच बोलतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा. यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे,''
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.