Municipal Elections : आघाडीसोबत राहायचे का ? ; अजितदादा म्हणाले..

राज्यस्तरावर जो निर्णय घेतला जाईल तो संबंधितांना कळविला जाईल. पुणे जिल्हा स्तरावरील कार्यकर्त्यांशीही मी याबाबत चर्चा करणार आहे.
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

बारामती : निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या निवडणुका स्वतंत्रपणे लढवायच्या की आघाडीसोबत (mahavikas aghadi)याबाबत कार्यक्रर्त्यांमध्ये संभ्रम आहे, याबाबत विरोधीपक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते बारामतीत माध्यमांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले, "कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पंधरा वर्षांपासून एकत्र असलो तरी स्थानिक पातळीवर काय निर्णय घ्यावा हा अधिकार जिल्हा स्तरावर घ्यायचो, प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती व कार्यकर्त्यांचं मत वेगळ असतं, तरीही राज्यस्तरावर जो निर्णय घेतला जाईल तो संबंधितांना कळविला जाईल. पुणे जिल्हा स्तरावरील कार्यकर्त्यांशीही मी याबाबत चर्चा करणार आहे,"

आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महाविकास आघाडी म्हणून लढाव्यात की नाही या बाबतचा निर्णय सोमवारी मुंबईत गेल्यावर एकत्र बसून घेतला जाईल, अशी माहिती पवार यांनी आज दिली.

Ajit Pawar
विरोधीपक्षनेते अजितदादांच्या कामांचा सपाटा सुरु..

"निवडणूक आयोगाने निवडणूका जाहीर केल्यामुळे त्याला सामोरे जावे लागणार आहे, सध्या कोकणात पाऊस सुरु आहे, सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन केले होते. आता निवडणूका जाहीर झाल्यामुळे सर्वांपुढेच पर्याय नाही, न्यायालयात जाऊ शकतात पण न्यायालयातही एकदा निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यात बदल करता येत नाही असा अनुभव आहे," असे पवार म्हणाले.

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या योजनांना स्थगिती बाबत अजित पवार म्हणाले, "या बाबत मी मुंबईत गेल्यावर मुख्यमंत्र्यांशी बोलेन, मीही या बातम्या वाचल्या आहेत, ज्या मान्यता दिल्या आहेत, तो जिल्हा नियोजन समितीला निधी दिला होता, याबाबतचा अधिकार त्यांच्याकडे असला तरी का हा निधी थांबविला आहे. या बाबत मी विचारण्याचा आम्हाला लोकशाही मध्ये अधिकार आहे, आम्ही तो विचारु. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून मगच या बाबत भूमिका मांडू,"

"ओबीसी आरक्षणाबाबत इम्पिरिकल डेटा जमा झाल्याची माहिती आहे, मध्यप्रदेशच्या धर्तीवर ओबीसी प्रवर्गाला आरक्षण मिळायला हवे अशी सर्वांचीच भूमिका आहे, ओबीसी वर्गाला प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळायला हवी अशी आमची भूमिका आहे," असे पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com