Mumbai News, 07 Apr : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यापासून त्यांच्या मृत्यूबाबत अनेक नेत्यांकडून संशय व्यक्त केला जात आहे. काही नेते अजित पवारांचा अपघात नव्हे घातपात झाल्याचा असा दावा करत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे आघाडीवर आहेत.
मागील काही दिवसांपूर्वी अमोल मिटकरी यांनी अजितदादांच्या घराच्या परिसरात अघोरी पूजा केल्याचा दावा केला होता. शिवाय त्यांनी अजित पवारांच्या अपघाताचं कनेक्शन नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातशी जोडलं होतं. अशातच आता अमोल मिटकरी यांनी आणखी एक धक्कादायक दावा केला आहे.
एक्सवर पोस्ट करत मिटकरी यांनी पुन्हा एकदा अजितदादांच्या विमान अपघाताचा संबंध अशोक खरातशी जोडला आहे. मिटकरी यांनी एक फोटो पोस्ट करत लिहिलं की, 'अजितदादांचा विमान अपघात प्रकरण संदर्भात नराधम अशोक खरात व त्याच्या आश्रमात झालेल्या अघोरी पूजेचा संबंध असल्याची सर्वांना शंका होतीच.
जानेवारी महिन्यात सर्वात जास्त SMS चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत. या महिन्यातील खरातचे CDR काढल्यास दादांचा अपघात की घातपात? हे स्पष्ट होईल, अशी शंका पुन्हा एकदा मिटकरी यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्या पत्रकार परिषदेत अशोक खरातच्या मोबाईलचा सीडीआर डेटा दाखवत त्याने कोणाकोणाला फोन केले हे दाखवलं होतं. याचवेळी दमानिया यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर समता पतसंस्थेकडून अनेक मेसेज आल्याचा खुलासा केला.
शिवाय हे मेसेज सतत येत होते त्यामुळे अजित पवारांच्या अपघाताशी समता पतसंस्थेचा संबंध असण्याची दाट शक्यता आहे, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला. अशातच आता मिटकरी यांनी देखील या मेसेज वरून अजित पवारांच्या अपघाताबाबत शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे खरंच या मेसेजचं अजितदादांच्या अपघाताशी काही संबंध आहे का? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.