
Mumbai News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणानंतर संपूर्ण राज्य हादरलं. या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी एन्ट्री घेतल्यानंतर या प्रकरणासह बीडमधील गुन्हेगारी,दहशत यांविरोधात सातत्यानं आवाज उठवत पोलिसांसह तपास यंत्रणांना कारवाईसाठी भाग पाडण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांचा वाटा मोठा आहे. त्याच दमानिया यांनी आता अजित पवारांच्या भेटीनंतर मोठा खुलासा केला आहे.
संतोष देशमुख हत्येप्रकरणावरुन धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडविरोधात एका पाठोपाठ एक धक्कादायक कनेक्शन समोर आणत त्यांच्या अडचणी वाढवल्या. याच अंजली दमानिया यांनी मुंडेंच्या राजीनाम्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची (Ajit Pawar) भेट घेतली. खरंतर अजित पवारांसोबत 36 चा आकडा असलेल्या दमानिया यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांची रिअॅक्शन काय होती, याचा खुलासा केला आहे.
अंजली दमानिया यांनी साम वृत्तवाहिनीच्या 'ब्लॅक अँड व्हाईट' या खास कार्यक्रमात बीड हत्या प्रकरणासह विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं. तसेच त्यांनी आत्तापर्यंत कट्टर विरोधक राहिलेल्या अजित पवारांची भेटायला गेल्यावर काय प्रतिक्रिया होती. त्या म्हणाल्या,खरंतर मी अजित पवारांना भेटू की नको असा विचार करत होते. त्यांच्या पक्षाच्या लोकांकडून अधिकृत एक भूमिका आली की,जोपर्यंत आमच्याकडे अधिकृत पुरावे मिळत नाही,तोपर्यंत कारवाई करणार नाही. राजीनामा घेणार नाही.
हे एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं,आणि मी पुरावे माध्यमांना देत होते.पण हे लोक ते आमच्यापर्यंत पोहचलेच नाही सांगून मोकळे होत होते.त्यामुळे मी ठरवलं की,त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांनाच पुरावे द्यावेत, कारण या आधी एसपींना दिले, एडीजेंना दिले,एजींना दिले.मुख्यमंत्र्यांना दिले.मुख्यमंत्री हवं तर कुठल्याही पक्षाच्या कुणाचाही राजीनामा घेऊ शकतात.पण मुख्यमंत्रीच म्हणाले की, ते माझ्या पक्षाचे नाहीत.म्हणून मी थेट अजित पवारांना भेटायचं ठरवलं.
पण माझा आणि अजित पवारांचा छत्तीसचा आकडा आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मग मी यांना भेटू कसं. पण मी म्हटलं आपण आपला विषय बाजूला ठेवू. माझा ,स्वाभिमान,सेल्फ रिस्पेक्ट जे काही असेल ते सगळं ठीक आहे. पण आता बीडमध्ये गेल्यावर तिथली परिस्थिती पाहिल्या इतकी मोठ्या प्रमाणावर दहशत आहे. ही जी संतोष देशमुखांची घटना घडली. ती इतकी निर्दयी होती.परत असं घडू नये म्हणून आपलं सगळं बाजूला ठेवून हे करायलं हवं असं मी स्वत:ला सांगितली.
पहिल्यांदा मी त्यांना मेसेज केला.पण काहीच उत्तर आलं नाही. मग मी पत्रकारांकडून त्यांच्या पीएंचा नंबर घेतला.आणि त्यांना मेसेज केला. मग त्यांचा संध्याकाळी कॉल आला. त्यांना मी अजित पवारांना भेटायचं असल्याचं सांगितलं. त्यानंतर तेही उडालेच असतील. त्यानंतर अजित पवारांचीही द्विधा मन;स्थिती झाली असेल.की यांना भेटू की नको.
मग संध्याकाळी पाच एक वाजता त्यांचा कॉल आला,ते त्यावेळी थोडे गांगरल्यासारखे वाटले.मी आत्ताच घरी पोहचलो. मी आत्ता रामटेक बंगल्यावर आहे. नंतर म्हणाले, नाही नाही. मी देवगिरीवर आहे.मग मला म्हणाले की,तुम्हांला किती वेळ लागेल. तर मी त्यांना सांगितलं की,मी सांताक्रुझला राहते. तास सव्वातास लागेल पोहोचायला.पण मला तु्म्हांला भेटायचं आहे.आणि मी येते असं मी अजित पवारांना म्हटलं.
तसेच मला पुरावे घेऊन यायचं आहे.त्यांनी यायला सांगितलं.गेल्यावर पहिले पाच एक मिनिटं एकमेकांकडे बोलून बघत नव्हते.त्यानंतर अजित पवार हे कितीतरी वेळ खाली मान घालूनच बोलत होते. आणि मग मी त्यांना म्हणाले, आता मी बोलू.मग त्यांनी ताई तुम्ही बोला असं सांगितलं. मी त्यांना एकापाठोपाठ एक पुरावे दाखवायला सुरुवात केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.