Ajit Pawar Vs Rohit Pawar : अजितदादांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, 'आमचीही चौकशी झाली, मात्र...'

Pune NCP : चर्चेतून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेल
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Maharashtra Political News : चौकशीचे अधिकार ज्यांना आहेत असे विभाग त्यांना काही चुकीचे वाटले तर चौकशीसाठी बोलवत असतात. यापूर्वी मलाही अँटीकरप्शन ब्युरो (एसीबी) तसेच इतर विभागांनी चौकशीसाठी बोलवले होते. मी तिथे गेलो होतो, पाच तास माझी चौकशी झाली. मात्र मी त्याचा कधी 'प्रपोगंडा' केला नाही. किंवा त्याचा 'इव्हेंट' केला नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांना लगावला आहे.

आमदार रोहित पवारांना सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावून चौकशीसाठी २४ जानेवारी रोजी बोलाविले होते. त्यावेळी राजकीय दबावातून जाणीवपूर्वक अशा चौकशी लावल्या जात आहेत. विरोधकांना त्रास देण्यासाठी हा उद्योग केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून केला जात आहे. राष्ट्रवादीतून बाहेर पडत अजित पवार आणि त्यांच्या सहकारी थेट सत्तेत सहभागी झाले. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी त्यास कडाडून विरोध करत राष्ट्रवादी महाविकास आघाडीसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे.

Ajit Pawar
Manoj Jarange Speech : किती मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार? जरांगेंनी भुजबळांना थेट आकडाच सांगितला

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर मतभेद झाल्यानंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार (Ajit Pawar) असे दोन गट पडले आहेत. हे गट एकमेकांवर टीका करत आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह आमदार रोहित पवार यांच्यावर टीका करत, आम्हीच खरे राष्ट्रवादी काँग्रेस आहोत, असा दावा अजित पवार गटाकडून केला जात आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यात पालकमंत्री म्हणून बोलताना अजित पवारांनी रोहित पवारांचा समाचार घेतला.

Ajit Pawar
Manoj Jarange Speech on Maratha Reservation : सगेसोयऱ्यांबाबत आज रात्रीतच अध्यादेश काढा, अन्यथा...; जरांगेंचा सरकारला मोठा इशारा

रोहित पवारांची (Rohit Pawar) ईडीकडून झालेल्या चौकशीबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, 'ज्या विभागांना चौकशीचे अधिकार आहेत ते चौकशीसाठी बोलवत असतात. मलाही कधी काळी चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. ते आपल्याला प्रश्न विचारतात त्याची उत्तरे आपण द्यायची असतात. माझीही पाच तास चौकशी झाली आहे. इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनीही चौकशी केलेली आहे. मात्र त्याचा कधी प्रपोगंडा केला नाही. लोक जमवून कधीही त्याचा इव्हेंट केला नाही.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार सुळे, रोहित पवारांना सोडायला गेल्या होत्या. त्यावर अजित पवार म्हणाले, 'कोणी काय करावे, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. कोणाला चौकशीला बोलवल्यानंतर कोणी-कोणी कुठे हजर राहावे, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. रोहित पवारांच्या चौकशीची बॅनरबाजी सुरू आहे. तशी बॅनरबाजी त्यांना करू देत. त्याच्यामुळे माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत,' असाही टोला त्यांनी लगावला.

मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेतून सुटेल

मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने मोर्चा मुंबईत येत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याबाबत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, 'याबाबत मुख्यमंत्र्यांचे सचिव जरांगे पाटलांशी चर्चा करत आहेत. त्यांच्या माध्यमातून ही चर्चा सुरू आहे. हा प्रश्न सुटावा ही माझी देखील इच्छा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, त्यासाठी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा सुरू आहे, चर्चेतून मार्ग हा निघत असतो.'

(Edited by Sunil Dhumal)

Ajit Pawar
Manoj Jarange Speech : मराठा आरक्षणाबाबत मोठा फैसला; काय म्हणाले जरांगे पाटील ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com