Sharad Pawar News : बंडानंतर राष्ट्रवादीचे मंत्री भेटायला गेले, पण शरद पवारांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही

Ajit Pawar News : अजित पवार यांनी मंत्र्यांसह शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चांना उधाण
Sharad Pawar, Praful Patle News
Sharad Pawar, Praful Patle NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून एक मेकांवर आरोप-प्रत्योरोपही केले. त्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री आज (ता.१६) शरद पवार यांना भेटण्यासाठी वाय. बी. चव्हाण सेंटर येथे गेले होते.

या भेटीमध्ये काय चर्चा झाली. याची माहिती राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patle) यांनी माध्यमांना दिली. यावेळी पटेल म्हणाले, ''आम्ही सर्वजण अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निवासस्थानी बसलो होते. शरद पवार (Sharad Pawar) आमचे दैवत आहेत. आम्ही त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो होते. शरद पवार हे आज त्यांच्या कामानिमित्त वाय. बी. चव्हाण सेंटर येथे येणार होते.''

Sharad Pawar, Praful Patle News
NCP Minister Meet Sharad Pawar : राष्ट्रवादीत काटे उलट फिरणार..; अजित पवार मनोमिलनासाठीच पवारांकडे ?

''याची कल्पना आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही त्यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. आम्ही त्यांना विंनती केली की राष्ट्रवादी एकसंघ राहिले पाहिजे. याचा विचार करावा, अशी विंनती त्यांना केली. त्यांनी शांतपणे आमचे म्हणणे ऐकून घेतले. यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही,'' असे पटेल यांनी यावेळी स्पष्ट केले.

Sharad Pawar, Praful Patle News
NCP Ministers Meet Sharad Pawar: अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शरद पवारांना केली 'ही' विनंती

राष्ट्रवादीत (NCP) फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांनी एकमेकांविरोधात कठोर भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर अजित पवारांनी त्यांच्या इतर बंडखोर आमदारांसह शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली. यावेळी अजित पवार, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील, धर्मराव बाबा पाटील, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com