Maharashtra Politics : अंबादास दानवेंच्या 'कॅशबॉम्ब' व्हिडिओचे धागेदोरे अजितदादांची राष्ट्रवादी ते थेट मातोश्रीपर्यंत..., शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा

Ambadas Danve Cash Bomb Video : शिंदेंच्या शिवसेनेचे काही आमदार हा व्हिडिओ एआयद्वारे तयार केल्याचं सांगत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी हा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरेंनी अंबादास दानवे यांना पाठवल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Eknath Shinde, Sunit Tatkare, Uddhav Thackeray
A still from the alleged “Ambadas Danve cash bomb” video shows a person handling cash bundles, intensifying the political debate across Maharashtra.Sarkarnama
Published on
Updated on

Ambadas Danve Cash Bomb : ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी ऐन हिवाळी अधिवेशन सुरू असताना एक खळबळजनक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमुळे आता राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे.

एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे काही आमदार हा व्हिडिओ एआयद्वारे तयार केल्याचं सांगत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी हा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरेंनी अंबादास दानवे यांना पाठवल्याचा गंभीर आरोप केला आहे.

दानवेंना शेअर केलेल्या एका व्हिडिओत शिंदेंचे आमदार महेंद्र दळवी दिसत आहेत. तर दुसऱ्या व्हिडिओत पैशांच्या बंडलांसोबत एक व्यक्ती दिसत आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देतना महेंद्र थोरवे म्हणाले, 'मला विश्वास आहे की, महेंद्र दळवी असं काही करणार नाहीत. पण अंबादास दानवेंनी जाणीवपूर्वक अधिवेशनच्या काळात हा व्हिडीओ व्हायरल केला.

Eknath Shinde, Sunit Tatkare, Uddhav Thackeray
Phaltan doctor death Case : हत्या की आत्महत्या? फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी CM फडणवीसांचा विधानसभेत सर्वात मोठा खुसाला...

रायगडमधील राजकारणाच या व्हिडिओशी धागा असावा. सुनील तटकरे हे रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी ते कुटील राजकारण खेळतात. त्यामुळे तटकरे आणि दानवे या दोघांनी मिळून महेंद्र दळवींचा व्हिडीओ व्हायरल केला असावा, असा संशय थोरवेंनी व्यक्त केला.

शिवाय आम्ही तटकरेंच्या रुपाने घरात शत्रू पाळला आहे. शिवसेना-भाजप-रिपाई ही पारंपरिक युती असताना भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सत्तेत घेतल्याचा फटका आम्हाला रायगडमध्ये बसत आहे, अशी उघड खंत देखील यावेळी थोरवेंनी बोलून दाखवली.

तटकरे विरोधकांना हाताशी धरुन अनेक गोष्टी करतात. पूर्वीपासूनच मातोश्री आणि तटकरेंचं साटेलोटे आहेतच. त्यामुळे हे होऊ शकतं असा गंभीर आरोप थोरवेंनी केला. त्यामुळे आता हे व्हिडिओ प्रकरण ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना इथपर्यंत मर्यादीत न राहता अजित पवारांच्या राष्ट्रवादीपर्यंत गेल्याचं पाहायला मिळत आहे.

Eknath Shinde, Sunit Tatkare, Uddhav Thackeray
Lok Sabha session Live : लोकसभा अध्यक्षांनी नीलेश लंकेंना दोनदा सुनावले; तुम्ही जेवढे लांबलचक विचाराल, तेवढे मंत्रीही...

दानवेंची पोस्ट नेमकी काय

अंबादास दानवे यांनी एक्सवर व्हिडीओ पोस्ट करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?' असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com