

Mumbai News: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर मंगळवारी (ता.20 ऑक्टोबर) होत आहे. या मेळाव्यात सुषमा अंधारे, आमदार कैलास पाटील, नितीन बानगुडे पाटील यांच्यासह खासदार संजय राऊत यांचीही तडाखेबंद भाषणं झाली. या नेत्यांनी विविध मुद्द्यांवरुन सत्ताधारी भाजप-एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यावर टीकेची तोफ डागली.
राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क येथील 60 व्या दसरा मेळाव्यात केंद्रातील मोदी सरकार आणि भाजप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. भलेभले आले आणि गेले, पण या शिवसेनेच्या व्यासपाठीवरची गर्दी कमी झाली नसल्याचा दावाही त्यांनी आपल्या भाषणात केला. तसेच या मुंबईसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांच्या लढ्याची आठवणही त्यांनी करुन दिली. यावेळी त्यांनी याच मुंबईत रोज कायदा आणि सुव्यवस्थेचा मुदडा पडतोय.
खासदार संजय राऊत या मेळाव्यात दहा गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत धक्कादायक विधान केलं आहे. तसेच राम मंदिरांतील 1400 कोटींची चोरी झाल्याचा खळबळजनक दावा केला आहे. तसेच त्यांनी शिवसेना एकच ती म्हणजी आमची. ही समोर आहे, ती आमची शिवसेना टिकाऊ, त्यांची शिवसेना विकाऊ. त्यांची शिवसेना अमित शाहांचा दांडिया खेळतेय असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच अल्बेनियातील जनतेनं सर्वोच्च न्यायालय जाळलं. तिथल्या न्यायालयानं सरकारची बाजू घेतली, म्हणूनच त्या जनतेनं त्यांचं न्यायालयच पेटवून दिलं.
1) लॉरेन्स बिश्नोई आहेत कुठे तो,अस्तित्वात नाही.अमित शाह हाच लॉरेन्स बिश्नोई आहेत.या देशाचा गृहमंत्री ज्याच्यावर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी तोच अमित शाह माफिया आहे. गुजरातचा अमित शाह लॉरेन्स बिश्नोई आहे. लॉरेन्स बिश्नोईचं नाव आहे, पण या देशातील सगळ्या गुंडाच्या टोळ्या त्यांच्या नेतृत्वात सुरू आहे. म्हणूनच आम्हाला रेजीम चेंज करायचं आहे. शिवसेनेशी गेल्या साठ वर्षांत अनेकांनी पंगा घेतला आहे. पण अनेक आले,अनेक गेले.
2) सुरक्षा हवी असेल तर शिवसेना हे एकच शस्त्र.आज आमच्याकडे पूजेला येथे धनुष्यबाण नसेल,पण पुढच्या वेळी दसरा मेळाव्याला आपल्याकडेच धनुष्यबाण असेल.
3) जेन झींचं नाव घेतलं की मोदी,अमित शाहांच्या बुडाला आग लागते. पण राहुल गांधींना पप्पू ठरवायला कोट्यवधी खर्च केले आणि नरेंद्र मोदींना 56 इंचवरुन छोटा बंदर या जेनझींनी केलं.
4) कुठलाही प्रश्न विचारला तर ते म्हणतात, महागाई वाढतेय, जय श्रीराम बोला. नोकरी नाही, कायदा सुव्यवस्था बिघडली, जय श्रीराम बोलो. आता तुम्ही हे राम.. जय श्रीराम बोला कारण तुम्ही जायची वेळ आली आहे.
5) राम मंदिरासाठी अभिजात मुहूर्त काढला होता. 12 जानेवारी 2024 मध्ये काढून दिलेला अभिजात मुहूर्त चुकला अन् काय काय चोरी झाली आहे. प्रभुरामाचे अलंकार, सीता माईची कर्ण फुलं, 27 मंगळसूत्रे, श्रीरामाच्या पादुका चोरीला गेल्या, सीसीटीव्ही बंद करुन दानपेट्या चोरल्या. राम मंदिरात 1400 कोटींची चोरी झाली आहे.
6) मोदी-शाह एप्रिलला जाणार आणि ग्यानुही जाणार आहेत. मार्च आणि एप्रिलपर्यंत देशात मोठे राजकीय बदल घडताना दिसतील.सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेले नाही.
7) अमित शाह राहतात तिथे 4 किमी परिसरात 2 लाखाचं सैन्य तैनात आहेत. पंतप्रधान मोदी भूमिगत,अंडरग्राऊंड आहेत, कारण जनता रस्त्यावर आहे. कारण आता त्यांना जनता घाबरत नाही.
8) आम्ही शेवटपर्यंत धनुष्यबाण सोडणार नाही आम्ही धर्मरक्षक आहोत. पुढच्या मेळाव्यात धनुष्यबाण आपलाच असेल.
9) मला कुणीतरी म्हटलं की, शिवसेनेचे दोन मेळावे होताहेत. पण आमच्याकडे आहे तो 'टिकाऊ माल'आहे. समोर जो आहे, तो टिकाऊ माल. तिकडे जो आहे,तो'बिकाऊ माल' जमला आहे. तिकडे शाहांचा दांडिया आहे.
10) शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला 60 वर्ष होताहेत. जे 60 वर्ष शिवसेनेसोबत जगले ते धन्य झाले असं मानतो. अनेक पिढ्या या शिवतीर्थाने घडवल्या. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं अन् भाषणानं धगधगून आणि पेटवून उठल्या. आम्हीही त्यातलेच एक आहोत.
खासदार संजय राऊतांनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात जेन झीच्या आंदोलनातील आवडलेल्या घोषणाही सांगितली. ते म्हणाले, जेन झींच्या आंदोलनातील आपल्याला आवडलेली घोषणा म्हणजे एका छोटी मुलगी बोलत आहे की,’ बाप की चड्डी फडी पडी है, घर में चुल्हा नही जल रहा है, और बेटा बोल रहा है मोदी… मोदी…’ असं त्यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.