Shoumika Mahadik news : जिव्हारी लागणाऱ्या पराभवानंतर शौमिका महाडिकांची पहिली प्रतिक्रिया; सतेज पाटलांना दिला सूचक इशारा

Shoumika Mahadik defeat, Gokul Dairy election, Shoumika Mahadik reaction : शौमिका महाडिक या भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी आहेत. माजी आमदार महादेवराव महाडिक हे त्यांचे सासरे असून भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक हे दीर आहेत.
Shoumika Mahadik
Shoumika Mahadik Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Gokul Milk Union election : कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या अटीतटीच्या लढतीत शौमिका महाडिक यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मागील निवडणुकीत ४३ मतांनी विजयी झालेल्या शौमिका महाडिक यांचा यावेळी अवघ्या सात मतांनी पराभव झाला आहे. त्यांच्या या पराभवाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. या जिव्हारी लागणाऱ्या पराभवानंतर त्यांनी सोशल मीडियातून त्यावर सूचक भाष्य केले आहे.

शौमिका महाडिक यांनी सोशल मीडियातून नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा देताना विजयाचा नवा संकल्पही केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सूचकपणे पराभवावर भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'एका पराभवाने संघर्षाची धार कमी होणार नाही. अन्यायाविरोधात उपसलेली तलवार म्यान होणार नाही. नव्या ताकदीने करूया संकल्प विजयाचा.' एकप्रकारे या पोस्टमधून त्यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांना इशाराच दिल्याची चर्चा आहे.

आक्रमक नेत्या

गोकुळ दूध संघाच्या संचालिका म्हणून काम पाहिलेल्या शौमिका महाडिक या आक्रमक नेत्या आहेत. दूध संघामध्ये मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांची एकत्रित सत्ता असताना त्या अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका मांडायच्या. त्यामुळे बहुतेकवेळा संघाची सर्वसाधारण सभा गाजायची. आता मंत्री मुश्रीफ त्यांच्यासोबत असतानाही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागल्याने त्याची बरीच चर्चा होत आहे.

Shoumika Mahadik
Sanjay Raut Albania post : संजय राऊतांच्या अल्बानिया पोस्टवरून सोमय्यांचा पलटवार; संजय निषादांच्या विधानाने चर्चेला नवे वळण

मोठे राजकीय पाठबळ

शौमिका महाडिक या भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी आहेत. माजी आमदार महादेवराव महाडिक हे त्यांचे सासरे असून भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक हे दीर आहेत. शौमिका महाडिक यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचं माजी अध्यक्षपद भूषवलं आहे. त्या जिल्हा परिषद सदस्य होत्या. त्या सध्या प्रदेश भाजपच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष आहेत.

Shoumika Mahadik
Rahul Gandhi viral video : राहुल गांधींचा विमानातील व्हिडिओ व्हायरल; भाजपने थेट सत्ता परिवर्तनाशी जोडले कनेक्शन

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. तसेच कोल्हापूर महिला जिल्हाध्यक्षही होत्या. दूध संघाच्या मागील निवडणूक त्या पहिल्यांदाच संचालक म्हणून निवडून आल्या होत्या. दुसऱ्या निवडणुकीत मात्र त्यांना विजय मिळविता आला नाही. मोठी राजकीय ताकद असून झालेल्या पराभवाची सर्वत्र चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com