

Maharashtra Covid management : राष्ट्रवादीचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात भाजप केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, कोरोना काळातील कामकजाचा उल्लेख करत टीका केली.
अमित शहा यांच्या या टीकेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आक्रमक झाला आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या पाठोपाठ शिवसेना युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी अमित शहा यांना कोरोना काळात भाजप शासित उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या परिस्थितीची आठवण करून देत घणाघात केला.
शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी, "कोविड-19 महामारीबाबत अमित शहा (Amit Shah) यांनी केलेल्या विधानावर बोलायचे झाल्यास, महाराष्ट्रातील नागरिकांसह राज्यात आलेल्या स्थलांतरित मजुरांनाही येथे पूर्णपणे सुरक्षित वाटत होते. आमच्याबरोबर प्रशासनाने त्यावेळी ज्यापद्धतीने काम केले. जागतिक आरोग्य संघटना आणि सर्वोच्च न्यायालयानेही आमच्या प्रयत्नांचे कौतुक केले होते. भाजपशासित राज्यांकडे पाहिले, तर उत्तर प्रदेशात गंगेत तरंगणारे मृतदेह किंवा गुजरातमध्ये रस्त्याकडेला मृतदेहांची अवहेलनेची परिस्थिती जगाने बघितली. भाजपची सत्ता असलेल्या त्या राज्यांमध्ये नेमकी काय परिस्थिती होती, यावर त्यांनी आत्मपरीक्षण करावे," असा टोला लगावला.
शिवसेना ठाकरे पक्षाच्या (Shivsena UBT) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी, महाराष्ट्रात येऊन, ठाकरेंवर बोलल्याशिवाय त्याची राष्ट्रीय न्यूज होत नाही. हे भाजपला चांगलेच माहिती आहे. अजितदादांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात अमित शहांनी उद्धवसाहेबांवर टीका करणे हे फार स्वाभाविक आहे. पण प्रश्न असा आहे की, अजितदादांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला अमित शहांनी यावच कशासाठी? दोघांमध्ये साधर्म्य काय आहे? असे प्रश्न उपस्थित केले.
साधर्म्य सांगताना, सुषमा अंधारे यांनी अमित शहा यांनी अजितदादांवर 70 हजार कोटींचा घोटाळा आरोप करून, त्यांच्यावर दबाव आणला. त्यांचा पक्ष आपला मांडलिकत्व बनवण्यासाठी प्रयत्न केला. अशा अमित शहांनी कोरोना काळातील त्यावेळच्या प्रशासनावर बोलणे हास्यास्पद आहे. अमित शहा ज्या गुजरातमधून येतात, तिथे कोरोना काळात प्रेत रस्त्यावर जाळली गेली. महाराष्ट्रात तशी एकाही प्रेताची विटंबना झाली नाही, असा घणाघात केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोरोना काळातील कामकाजाचा उल्लेख करताना अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. कोरोना काळात त्यावेळचे मुख्यमंत्री संपर्कात नव्हते, मात्र अजित पवार सकाळी सात वाजल्यापासून मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधत राज्याची काळजी घेत होते, असे विधान अमित शहांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.