Amruta Fadnavis Reel : ट्रॅफिकमध्ये अडकल्या अन् अमृता फडणवीसांनी भन्नाट व्हिडिओ बनवला; नेटकरी म्हणतात...

Amruta Fadnavis Reel News : 'अमृता फडणवीसांचा व्हिडिओ तब्बल इतक्या लोकांनी पाहिला..'
Amruta Fadnavis
Amruta Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. कधी त्या त्यांच्या गाण्यावरून चर्चेच येतात, तर कधी ते त्यांच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे वादाच्या स्थानी असतात. याशिवाय अमृता फडणवीस सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय असतात. त्यांच्या सोशल पोस्टमुळेही त्यांची चर्चा होत असते. आता त्यांचा एक भन्नाट रील व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

Amruta Fadnavis
Eknath Shinde In Baramati : बारामतीत आज शिंदे-फडणवीस-पवार; धनगर आंदोलकांची भेट घेणार ?

अमृता फडणवीस यांनी इंस्टाग्रामवर एक रील शेअर केला आहे. यामध्ये करन जोहर यांनी दिग्दर्शित केलेला राॅकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातील 'झुमका ' या गाण्यावर फडणवीस नृत्य करताना दिसत आहेत. त्यांनी त्यांच्या व्हिडिओला ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर थोडसं मनोरंजन' असं कॅप्शन दिले आहे. त्यांचा हा व्हिडिओ नेटकरी शेअर करत आहेत.

Amruta Fadnavis
Devendra Fadnavis : अमृता आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सुखी संसाराची १८ वर्षे

वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर अमृता फडणवीसांनी या वेळात रील बनवून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसून येत आहे. आणि झुमका या गाण्याला साजेसे असे कानातले आभूषणे घातली आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सोशव मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ जवळपास ७ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. पण काही नेटकऱ्यांनी त्यांच्या या व्हिडिओवर नाराजीदेखील व्यक्त करत, विरोधात कमेंट्स केल्या आहेत.

अमृता फडणवीस यांच्या या व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर काही युजर्सनी नापसंती दर्शवली आहे. या व्हिडिओवर काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे की, "हे असलं काही गरजेचं आहे का? , "कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?" , "ही पोस्ट डिलीट करा अमृताताई," अशा प्रकारचे कमेंट्सही काही जणांनी केल्या आहेत, तर हा त्यांच्या स्वातंत्र्याचा भाग आहे, असे म्हणत काही युजर्सनी अमृता फडणवीस यांची पाठराखण केली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com