Anjali Damania : राष्ट्रवादी नेत्याच्या ‘त्या’ पोस्टनंतर दमानिया यांना संताप अनावर; म्हणाल्या, ‘जीवाची पर्वा न करता लढणाऱ्यांचा असा छळ करणार का?’

Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड आणि त्याच्या माध्यमातून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडत आहेत.
Anjali Damania-Suraj Chavan-Dhananjay Munde
Anjali Damania-Suraj Chavan-Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 21 February : राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडेंवर आरोप करण्यासाठी ‘रिचार्जवाल्या’ ताईच्या खात्यावर 25 खोक्याचा बॅलन्स टाकण्यात आला आहे, असा दावा चव्हाण यांनी केला आहे. त्याला दमानिया यांनी उत्तर देताना ‘खूप राग आला आहे, तरीही मी माझ्या भाषेची पातळी सोडणार नाही,’ असे सांगताना थेट फडणवीस आणि अजित पवारांना आवाहन केले आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड आणि त्याच्या माध्यमातून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडत आहेत. देशमुख खूनप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर दमानिया या ठाम आहेत. वेगवेगळ्या मुद्यांच्या आधारे दमानिया यांच्याकडून मुंडे यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांच्यावरही राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रहार केले जात आहेत. पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून त्यांना ‘रिचार्जवाल्या ताई’ म्हणून टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यालाही दमानिया यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून प्रत्युतर दिले आहे. त्या म्हणाल्या, ‘खूप राग आला आहे, तरीही मी माझ्या भाषेची पातळी सोडणार नाही.’

पोस्टमध्ये दमानिया यांनी म्हटले आहे, आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांना माझा थेट आवाहन आहे. ताबडतोब माझी सगळीच्या सगळ्या खाती सरकारने तपासावीत. कुठेही एक दमडीदेखील unaccounted आहे का ते पाहावे. इतका अमाप भ्रष्टाचार होतोय आणि मी लढू नये? स्वतःच्या जीवाची पर्वा ना करता लढणाऱ्या लोकांचा असा मानसिक छळ करणार?

Anjali Damania-Suraj Chavan-Dhananjay Munde
Operation Tiger : विदर्भात चर्चा ‘ऑपरेशन टायगर’ची; पण एकनाथ शिंदेंच्या गळाला लागला काँग्रेसचा बडा मासा!

राजकारणात पुढे जाण्यासाठी, नेत्याला खुश करण्यासाठी खालच्या पातळीला जाऊन हे बोलतात ना? योग्य आहे हे? जर महाराष्ट्राच्या मीडियाला माझ्या लढ्याबद्दल जरा पण आदर असेल तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची ह्यावर आजच्या आज प्रतिक्रिया घ्यावी, असे आवाहन दमानिया यांनी माध्यमांनाही केले आहे.

अंजली दमानिया म्हणाल्या, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांही माझी विनंती आहे. माझी ताबडतोब चौकशी करावी. माझ्या सगळ्या खात्यांची ताबडतोब चौकशी करावी. होऊन जाऊ दे. मी भ्रष्ट असेन तर मला शिक्षा झाली पाहिजे आणि जर नसेल तर मग ह्या सूरज चव्हाणला योग्य ती शिक्षा द्यावी, असेही दमानिया यांनी म्हटले आहे.

Anjali Damania-Suraj Chavan-Dhananjay Munde
Prakash Ambedkar News : जरांगेंना कंट्रोल करण्यासाठी भाजपाचा प्लॅन, आता धसांचाच पत्ता कट! प्रकाश आंबेडकरांचा आरोप

सूरज चव्हाण यांनी काय आरोप केले होते?

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यासाठी ‘रिचार्जवाल्या’ ताईच्या खात्यावर 25 खोक्याचा बॅलन्स टाकण्यात आला आहे. काहीही काम न करता वर्षाला पंधरा देश फिरणाऱ्या अडीच कोटी टॅक्स भरणाऱ्या ‘स्वयंघोषित’ समाजसेविका ताई कोणाच्या माध्यमातून तुमचा रिचार्ज झाला पुराव्यासह ....लवकरच, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांली केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com