Sanjay Raut : "काहींचा रडू बाई रडू शो..."; राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावताच राऊतांचं रोखठोक प्रत्युत्तर

Sanjay Raut Criticize Raj Thackeray: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयोगाच्या लोकांनी दोन वेळा बॅग तपासल्यावरून राज्यातील राजकारणात तापलं आहे. या प्रकरणावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
Sanjay Raut, Raj Thackeray, Uddhav Thackeray
Sanjay Raut, Raj Thackeray, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 14 Nov : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची निवडणूक आयोगाच्या लोकांनी दोन वेळा बॅग तपासल्यावरून राज्यातील राजकारणात तापलं आहे. या प्रकरणावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

ठाकरेंच्या शिवसेनेकडून सत्ताधाऱ्यांच्या बॅगा का तपासल्या जात नाहीत? असा सवाल केला जात होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदें (Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या बॅगा तपासल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.

याच सर्व प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. एका सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले, "मला का तपासलं म्हणून सध्या काही लोकांचा रडू बाई रडू शो सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या लोकांनी हेलिकॉप्टरमधून बॅग काढून का तपासलं म्हणून हा शो सुरू आहे.

Sanjay Raut, Raj Thackeray, Uddhav Thackeray
Sanjay Raut : संजय राऊत यांचा सवाल, मंत्री गिरीश महाजन यांनी केले तरी काय?

पण तपासलं तर तपासलं मलाही तपासलं आहे. त्यांचं ते काम आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या लोकांना कळायला पाहिजे होतं, ज्याच्या हातातून पैसे सुटत नाही त्याच्या बॅगेत पैसे येतील कुठून?" असा टोला त्यांनी लगावला.

Sanjay Raut, Raj Thackeray, Uddhav Thackeray
Dharashiv Assembly Election: ठाकरेंवरील निष्ठेमुळे नव्हे तर 'या' धमकीमुळे कैलास पाटील सुरतमधून माघारी फिरले, जुन्या सहकाऱ्याचा मोठा दावा

तर राज ठाकरेंच्या याच वक्तव्याला आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिलं आहे. राऊत म्हणाले, "राज ठाकरेंकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. गेली 25 वर्ष झाली ते रडतच आहेत. त्यांच्या रडण्याला राज्यातील जनता जास्त महत्व देत नाही," असं म्हणत राऊतांनी राज यांना डिवचलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com