Ashish Shelar : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा ठाकरें बंधूंकडून राजकीय वापर, आशिष शेलारांचा आरोप

Raj Thackeray Uddhav Thackeray Tiranga Morcha : विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देण्याऐवजी काही पक्ष या विषयाचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला.
Ashish Shelar
Ashish ShelarSarkarnama
Published on
Updated on

Ashish Shelar News : विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे काही राजकीय पक्ष स्वतःची भूमिका अधोरेखित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केला. ठाकरे बंधूंच्या मोर्चावरही त्यांनी निशाणा साधला.

ठाण्यातील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते. यावेळी आमदार माधवी नाईक, उपमहापौर कृष्णा पाटील, गटनेते मुकेश मोकाशी, सरचिटणीस सचिन पाटील, सागर भदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित आंदोलनाबाबत शेलार म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देण्याऐवजी काही पक्ष या विषयाचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांच्या भावना भडकावून राजकीय लाभ मिळविण्याचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असा दावा त्यांनी केला.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा वापर केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी होत असल्याचा आरोप करत त्यांनी अशा आंदोलनांमुळे विद्यार्थ्यांची दिशाभूल होणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला. पेपरफुटी प्रकरणाबाबत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट असल्याचे सांगताना शेलार म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) सुरू आहे. विविध ठिकाणी तपास आणि कारवाया सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Ashish Shelar
Akola Crime : अपघात की हत्या? शिवसेना नेत्याच्या मृत्यूला धक्कादायक वळण, कुटुंबियांचा माजी जिल्हाप्रमुखावरच गंभीर आरोप

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेचा उल्लेख केला. सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना ४२ हजार कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचाही या योजनेत समावेश करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वीजबिल माफी, सिंचन, पीक विमा, जलशिवार आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या योजनांमधून सरकार शेतकऱ्यांना आधार देत असल्याचा दावा त्यांनी केला. स्मार्ट मीटरबाबत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींची दखल सरकारने घेतली असून त्या दूर करण्यासाठी आवश्यक सुधारणा आणि उपाययोजना सुरू असल्याची माहितीही शेलार यांनी दिली.

Ashish Shelar
Dharmendra Pradhan Resign: धर्मेंद्र प्रधानांची विकेट पडली,राष्ट्रपतींनी स्विकारला राजीनामा; मोदींनी विश्वासू मंत्र्यांकडे सोपवली शिक्षण खात्याची जबाबदारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com