मुंबई : विधानसभा अध्यक्षांची निवडणूक (assembly speaker election) काल झाली. यावेळी विधानभवनात मोठ्या घडामोडी घडल्या. शिवसेनेनं (Shiv Sena) विधानभवनातील आपलं कार्यालय सील केलं होत. दुसरीकडे एकनाथ शिंदे (cm eknath shinde) गटातील आमदारांनी त्यांचे फोन बंद ठेवण्याचा आदेश काल देण्यात आला होता. (Shivsena News Updates)
विधानभवनातील शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालय आज (सोमवारी) उघडण्यात आले आहे. आमदार अजय चौधरी हे कार्यालयात उपस्थित होते. ओळखपत्राशिवाय कार्यालयात प्रवेश दिला जात नसल्याचे समजते. एकनाथ शिंदे गटाचे आमदारांनी या शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालयाचा ताबा घेऊ नये, यासाठी शिवसेनेची ही सावध भूमिका असल्याचे सुत्रांनी सांगितले.
काल पहिल्यांदाच शिवसेनेचे आमदार आणि एकनाथ शिंदे हे विधानभवनात आमनेसामने आले. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीची पहिली लढाई जिंकल्यानंतर आज विधानसभा सभागृहात भाजप-शिंदे गटाची बहुमत चाचणी होणार आहे.
त्यासाठी आमदार विधानभवनाकडे रवाना होत आहेत. दुसरीकडे शिवसेनेच्या 16 आमदारांना शिंदे गटाकडून व्हीप बजावण्यात आला आहे. तर शिवसेनेकडूनही प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्व आमदारांना व्हीप बजावला आहे.
आज बहुमतासाठी शिंदे गटाने शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह 16 आमदारांना व्हीप बजावला आहे. त्यामुळे या आमदारांनी व्हीप पाळला नाही तर त्यांची आमदारकी रद्द करण्याची प्रक्रिया शिंदे गट करू शकतो. दरम्यान, या निर्णयाविरोधात शिवसेना कोर्टात जाणार असल्याचे शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.