Bala Nandgaonkar : भुजबळांचा पराभव करणाऱ्या नेत्याची दोन तपानंतर शिवसेना भवनात एन्ट्री; ‘त्या’ आठवणींनी मनसे नेत्याचा कंठ दाटला!

Shiv Sena Bhavan Entry News : मनसे नेते बाळा नांदगावकर 24 वर्षांनंतर शिवसेना भवनात दाखल झाले. पायरीवर नतमस्तक होत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढत भावनिक क्षण अनुभवला.
Bala Nandgaonkar
Bala NandgaonkarSarkarnama
Published on
Updated on
  1. 24 वर्षांनंतर शिवसेना भवन भेट: मनसे नेते बाळा नांदगावकर हे तब्बल 24 वर्षांनंतर शिवसेना भवनात आले आणि पायरीवर नतमस्तक होऊन प्रवेश केला.

  2. भावनिक क्षण: त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि जुन्या शिवसेना काळातील आठवणींना उजाळा देत, त्या काळातील प्रेम, ओरडा आणि जल्लोषाची आठवण केली.

  3. राज-उद्धव एकत्र येण्याचे स्वागत: नांदगावकर म्हणाले की दोन्ही भावांमधील मतभेद आता संपले असून विश्वास पुन्हा निर्माण झाला आहे.

Mumbai, 19 October : शिवसेनेतील बंडानंतर पॉवरफुल्ल छगन भुजबळांचा पराभव करणारे बाळा नांदगावकर हे तब्बल 24 वर्षांनंतर शिवसेना भवनात आले होते, त्यांनी शिवसेना भवनाच्या पायरीवर नतमस्तक होऊन प्रवेश केला, त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकरांचा कंट दाटून आला होता.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यामुळे शिवसेना (Shivsena) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन्ही पक्षातील नेतेमंडळींच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे. अनेकजण त्या आठवणी बोलून दाखवत आहेत. विशेषतः शिवसेनेत असताना बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना भवनातील अनेक प्रसंगांचा दोन्ही बाजूंच्या नेतेमंडळींकडून उल्लेख केला जात आहे.

निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराविरोधत महाविकास आघाडीसोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही मोहीम उघडली आहे. महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी परवा राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांची भेट घेतली. मात्र, समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आयोगाच्या विरोधात एक नोव्हेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय सर्वपक्षीय नेतेमंडळींनी घेतला आहे.

निवडणूक आयोगाच्या विरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चाची माहिती देण्यासाठी शिवसेना भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या पत्रकार परिषदेसाठी मनसे नेते बाळा नांदगावकर हे शिवसेना भवनात आले होते. त्या वेळी नांदगावकर यांनी शिवसेना भवनाच्या पायरीचे दर्शन घेऊन आतमध्ये एन्ट्री केली, त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे.

Bala Nandgaonkar
Rajan Patil On Ajit Pawar : ....म्हणून अजितदादांनी मला फोन केला नसेल; राजन पाटलांनी व्यक्त केली खंत

शिवसेना भवनाच्या अनुभवाबाबत बाळा नांदगावकर म्हणाले, शिवसेना भवनात मी 24 वर्षांनंतर आलो, त्यामुळे बाळासाहेबांच्या आणि इतर नेतेमंडळींच्या आठवणींना उजाळा मिळाला. याच ठिकाणी आमच्या नेतेमंडळींचे विशेषतः बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेमही मिळाले, तसेच त्यांचा ओरडाही खाल्ला आहे. त्यांचं रागावणंही पाहिलेले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी याच शिवसेना भवनातून माझी नगरसेवकपदाची, छगन भुजबळ यांच्या विरोधात माझगाव मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली होती. तीही मला आठवली. निवडून आल्यानंतर बाळासाहेबांनी मला शिवसेना भवनात बोलावून घेतले होते, त्या वेळचा शिवसेना भवनासमोर जल्लोषही मी पाहिला आहे. त्या आठवणींनी कंठ दाटून आला, की एवढ्या वर्षांनी आपण शिवसेना भवनात येतोय, असेही नांदगावकर यांनी नमूद केले.

नांदगावकर म्हणाले, बाळासाहेबांचा शिवसैनिक मी तेव्हाही होतो आणि आताही आहे. दोन्ही भावांमध्ये मतभेद होते, मात्र आता ते मतभेद संपुष्टात आलेले आहेत, असं मला दिसंतय. मनही जुळली आहेत, दोघांमध्ये विश्वासही निर्माण झाला आहे, त्यामुळे शिवसेना भवनात पाऊल ठेवताना आनंद आणि उत्साह वाटला.

Bala Nandgaonkar
Murlidhar Mohol : मोहोळांची पवारांसोबतची राजकीय ‘कुस्ती’ खेळीमेळीत; शेट्टींना मात्र ललकारले...

Q1. बाळा नांदगावकर किती वर्षांनी शिवसेना भवनात आले?
A1. तब्बल २४ वर्षांनंतर ते शिवसेना भवनात आले.

Q2. त्यांनी शिवसेना भवनात प्रवेश कसा केला?
A2. त्यांनी पायरीवर नतमस्तक होऊन भवनात प्रवेश केला.

Q3. त्यांनी कोणत्या आठवणींना उजाळा दिला?
A3. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेम, राग आणि जल्लोषाच्या क्षणांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या.

Q4. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संबंधांबद्दल त्यांनी काय म्हटले?
A4. दोघांमधील मतभेद संपले असून आता विश्वासाचे नवे नाते निर्माण झाले आहे, असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com