Mangalvedha Nagarpalika : ‘काहीही करा, पण मंगळवेढ्याचा नगराध्यक्ष शिवसेनेचाच बसवा’; श्रीकांत शिंदेंचा शिवसेना नेत्यांना आदेश

Nagarpalika Election 2025 : सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिला “काहीही करा, पण मंगळवेढ्याचा नगराध्यक्ष शिवसेनेचाच बसवा; सर्व २० जागांची तयारी सुरू करा.”
Mangalvedha Shivsena
Mangalvedha ShivsenaSarkarnama
Published on
Updated on
  1. मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील सर्व पक्ष स्वतंत्र लढण्याची तयारी करत आहेत, ज्यामुळे आघाडीचे विभाजन होण्याची शक्यता आहे.

  2. खासदार श्रीकांत शिंदे यांनी बैठकीत “मंगळवेढ्याचा नगराध्यक्ष शिवसेनेचाच बसवा” अशी स्पष्ट सूचना दिली, तसेच 20 जागांसाठी तयारी सुरू ठेवण्याचे आदेश दिले.

  3. शिवसेनेतून माधवी किल्लेदार नगराध्यक्षपदाच्या दावेदार ठरत असून, त्यांच्या पती आणि पुत्र हे दोघेही स्थानिक राजकारणात सक्रीय आहेत.

Mangalvedha, 19 October : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचाली गतिमान होत आहेत. महायुतीमधील तीनही पक्ष स्वतंत्र्य लढण्याच्या तयारी असून तशी व्यूहरचनाही आखली जात आहे. त्यातूनच सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांची खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात ‘काहीही करा; पण मंगळवेढ्याचा नगराध्यक्ष शिवसेनेचाच बसवा. तसेच नगरपालिकेच्या २० ही जागांची तयारी सुरू करण्याची सूचनाही खासदार शिंदे यांनी दिली आहे.

नव्या प्रभाग रचनेनुसार मंगळवेढा (Mangalvedha) नगरपालिकेची निवडणूक थेट नगराध्यक्ष आणि 20 नगरसेवकांसाठी होणार आहे, त्यासाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत पार पडल्यानंतर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.

भारतीय जनता पक्षाने थेट पक्षीय चिन्हावर निवडणूक लढवण्याचे संकेत यापूर्वीच जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी दिले आहेत, त्यामुळे मंगळवेढा नगरपालिकेची निवडणूक पक्षचिन्हावर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे अध्यक्ष अजित जगताप यांनी नगराध्यक्षांसह 20 उमेदवारांची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेकडूनही (Shivsena) नगराध्यक्षपदासाठी शहरप्रमुख प्रतीक किल्लेदार यांच्या मातोश्री माधवी किल्लेदार या दावेदार मानल्या जात आहेत. त्यांचे पती अरुण किल्लेदार यांना नगरपालिकेच्या राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. त्यांचे पुत्र प्रतीक किल्लेदार हे शिवसेनेचे शहरप्रमुख असून त्यांना पालिकेच्या कारभाराची खडानखडा माहिती आहे.

Mangalvedha Shivsena
Rajan Patil : राजन पाटलांनी उमेश पाटलांचे चॅलेंज किरकोळीत काढले; ‘मीच काय माझा छोटा नातूही मोहोळ, नरखेडलाच काय तुम्ही सांगाल तेथे येईल’

शहरप्रमुख प्रतीक किल्लेदार, तालुकाप्रमुख आबा लांडे यांनी दोन दिवसांपूर्वीच शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या जंजिरा या शासकीय निवासस्थानी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. त्या भेटीत खासदार श्रीकांत शिंदे यांनी नगराध्यक्षपदासह वीस जागा लढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यात नगराध्यक्ष हा शिवसेनेचा झाला पाहिजे, अशी सूचना शिंदे यांनी केली आहे.

भाजप, शिवसेना, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घडणाऱ्या घडामोडी पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचे विभाजन होणार, याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मंगळवेढ्याच्या राजकारणात महाविकास आघाडीही ताकद राखून आहे. मात्र, महाविकास आघाडीपेक्षा समविचारी आघाडीची चर्चा शहरात जोरात आहे. तशा बैठकादेखील झाल्या आहेत. मात्र, या बैठकांत काय निर्णय झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

Mangalvedha Shivsena
Mahayuti Politics : महायुतीत पहिला मिठाचा खडा पडला ! शिंदेंच्या आमदाराने घोषणा केली, मग भाजपच्या नेत्यालाही राहवलं नाही..

Q1: मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीत किती जागांसाठी मतदान होणार आहे?
A1: नगराध्यक्ष आणि 20 नगरसेवक पदांसाठी निवडणूक होणार आहे.

Q2: खासदार श्रीकांत शिंदे यांनी बैठकीत काय निर्देश दिले?
A2: नगराध्यक्षपद शिवसेनेचेच झाले पाहिजे आणि 20ही जागांसाठी तयारी सुरू ठेवावी, असे त्यांनी सांगितले.

Q3: शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी कोण दावेदार आहेत?
A3: शहरप्रमुख प्रतीक किल्लेदार यांच्या मातोश्री माधवी किल्लेदार या प्रमुख दावेदार आहेत.

Q4: महायुतीतील पक्ष निवडणुकीत एकत्र लढणार का?
A4: नाही, सध्या सर्व पक्ष स्वतंत्र लढण्याची तयारी करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com