Supriya Sule News : बारामतीला आणखी एक 'लाल दिवा' मिळाे, सुप्रिया सुळेंना मंत्रिपदाच्या शुभेच्छा; भाजप आमदाराचे सूचक...

Supriya Sule Ministership News : "राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही.."
Supriya Sule News
Supriya Sule News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताज्या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमचेच नेते आहेत, पक्षामध्ये कसलीही फूट पडलेली नाही, असे मोठे विधान शरद पवार यांनी केल्याने राजकीय चर्चेला फोडणी मिळाली आहे. त्यामुळे राजकीय गोंधळ वाढत आहे. (Latest Marathi News)

Supriya Sule News
NCP Crisis News : 'पक्षात फूटच नाही मग माझा फोटो वापरू नका का म्हणता?' दादा गटाचा पवारांना सवाल !

शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी आता सुप्रिया सुळे यांच्यासंदर्भाने मोठे वक्तव्य केले आहे. बारामतीला अजून एक लाल दिवा मिळो, अशी मी प्रार्थना करतो," सुप्रिया सुळे यांना केंद्रीय मंत्रीपदाच्या नितेश राणेंकडुन शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.

Supriya Sule News
Sharad Pawar News : शरद पवारांचे मोठं विधान ; अजित पवार हे आमचेच नेते, राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही..

सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य-

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही, आमच्यातील काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली असली तरी आमचा पक्ष एकच आहे. अजित पवार हे आमच्याच पक्षाचे नेते आहेत," असा दावाही खासदार सुळे यांनी केला होता. सुळेंच्या वक्तव्याला आज शरद पवारांनी दुजोरा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com