Ravindra Waikar : शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरू असतानाच वायकरांना मोठा दिलासा, नेमकं प्रकरण काय?

Ed Raid On Ravindra Waikar : काही दिवसांपूर्वी ईडीनं रवींद्र वायकरांच्या संबंधित सात ठिकाणांवर छापेमारी केली होती.
eknath shinde Ravindra Waikar uddhav thackeray
eknath shinde Ravindra Waikar uddhav thackeraysarkarnama
Published on
Updated on

ईडीच्या निशाण्यावर असलेले तरीही खंबीरपणे उद्धव ठाकरे यांना साथ देणारे रवींद्र वायकर ( Ravindra Waikar ) शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरू आहे. अशातच आता जोगेश्वरीमधील क्लबच्या जागेचा गैरवापर आणि तिथे हॉटेल बांधताना तथ्य लपवल्याचा आरोपातून वायकरांना दिलासा मिळाला आहे. वायकरांच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची तयारी मुंबई महापालिकेने ( Mumabi Corporation ) दाखवली असून तसे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. यावर 26 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ( Ravindra Waikar Latest News )

eknath shinde Ravindra Waikar uddhav thackeray
Shrikant Shinde : "CM शिंदेंनी माझ्याविरोधात लढावे", ठाकरेंच्या आव्हानावर श्रीकांत शिंदे म्हणाले, "आपली..."

रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरी येथील आरक्षित जमिनीवर पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामासाठी परवानगी मागताना तथ्ये लपवली आणि खोटे हमीपत्र दाखल केल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 2022 मध्ये केला होता. याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने ( ईडी ) गुन्हा दाखल केलेला. काही दिवसांपूर्वी वायकरांच्या घरासह सात ठिकाणी ईडीनं छापेही टाकले होते. वायकरांविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेंना सष्टेंबर महिन्यात गुन्हा दाखल केला होता. त्याच गुन्ह्याच्या आधारावर ईडी तपासही करत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हॉटेलच्या बांधकामाला परवानगी मिळवताना माहिती लपवल्याचा आरोप वायकरांवर केला होता. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेनं वायकरांच्या हॉटेलला बांधकामासाठी दिलेली परवानगी रद्द केली होती. याविरोधात वायकरांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, न्यायालयानं मुंबई महापालिकेचा निर्णय योग्य ठरवून वायकरांची याचिका फेटाळली होती. त्यानंतर वायकरांनी महापालिकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

eknath shinde Ravindra Waikar uddhav thackeray
Imtiaz Jaleel : "...तर मी अमरावतीतून निवडणूक लढण्यास तयार," जलीलांचं राणांना प्रत्युत्तर

अशातच आतापर्यंत वायकरांविरोधात भूमिका घेणाऱ्या पालिका प्रशासनानं अचानक प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची तयारी दाखवली आहे. तसे, प्रतिज्ञापत्रही सर्वोच्च न्यायालयात दाखल केलं आहे. पण, पालिकेनं प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची तयारी दाखवल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच, पालिकेनं तक्रार मागे घेतल्यास ईडीनं दाखल केलेला गुन्हाही रद्द होऊ शकतो. त्यामुळे 26 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, शिवसेनेतील फुटीनंतर रवींद्र वायकर उद्धव ठाकरेंच्या पाठिमागे खंबीरपणे उभे राहिले. पण, ईडीनं केलेल्या कारवाईनंतर रवींद्र वायकर शिंदे गटात जाण्याची चर्चा रंगली होती. तसेच, खासदार संजय राऊत यांनी रवींद्र वायकरांना धमकावले जात असल्याचा आरोप केला होता.

eknath shinde Ravindra Waikar uddhav thackeray
Sharad Pawar : शरद पवारांनी रायगडावरून फुंकली 'तुतारी', म्हणाले, "महाराष्ट्राची स्थिती बदलून..."

'एक्स' अकाउंटवर संजय राऊत म्हणाले, "शिवसेनेतील आमचे सहकारी नेते आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून ईडी वगैरे तपासयंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव आहे. येत्या काही दिवसांत शिवसेना सोडा. पक्षांतर करा. नाहीतर तुरुंगात जा असे त्यांना धमकावले जात आहे. हा दहशतवाद आहे. असे राजकारण याआधी कधीच घडले नव्हते."

eknath shinde Ravindra Waikar uddhav thackeray
Amol Mitkari : आव्हाडांना देण्यासाठी 1 लाखाच्या चेकवर मिटकरींनी केली सही; पण घातली 'ही' अट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com