Thackeray Vs Koshyari: कोश्यारी पुन्हा बोललेच! माजी राज्यपालांचा राज ठाकरेंवर थेट हल्ला; म्हणाले, “मोदींना जरा जास्तच घाबरलेत”

Thackeray Vs Koshyari: मुंबईत नुकताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलब्रेटिंनी हजेरी लावली होती.
Bhagat Singh Koshyari_Raj Thackeray
Bhagat Singh Koshyari_Raj Thackeray
Published on
Updated on

Thackeray Vs Koshyari: मुंबईत नुकताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलब्रेटिंनी हजेरी लावली होती. पण सेलिब्रेटींच्या एकत्र येण्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संघाला आणि संघ प्रमुख मोहन भागवतांना डिवचलं होतं. सेलिब्रेटींची ही गर्दी तुमचं रटाळ भाषण ऐकायला नव्हे तर मोदींच्या भीतीपोटी जमली होती, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावर आता महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या वृत्तीनुसार प्रत्युत्तर दिलं आहे. यानंतर पुन्हा एकदा मनसेनं कोश्यारींना एकाच वाक्यात पलटवार केला.

Bhagat Singh Koshyari_Raj Thackeray
BMC Election 2026 : 'फडणवीस हे नाव मुंबईला माहिती नव्हतं तेव्हापासून आम्ही कोस्टल रोडची तयारी सुरु केलेय, भाजपने सुरू केलाय तो विकास नव्हे विनाश...'

राज ठाकरे काय म्हणाले होते?

रा. स्व. संघाच्या कार्यक्रमावर राज ठाकरे यांनी ट्विट केलं होतं. यात ते म्हणाले होते की, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी, भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आलं होतं, त्यातले काही हजर देखील होते! परंतू मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की, ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती! नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळं ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या" राज ठाकरेंच्या या विधानामुळं अनेक भाजप अन् संघ समर्थक नाराज झाले होते.

Bhagat Singh Koshyari_Raj Thackeray
NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाला वेग? पवार कुटुंबीय पोहोचले दिल्लीत; काय घडताहेत घडामोडी जाणून घ्या

राज ठाकरेंना कोश्यारींचं प्रत्युत्तर

राज ठाकरेंच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना कोश्यारी म्हणाले, "सगळेच जण नरेंद्र मोदींना घाबरले नसतील, मी राज ठाकरेंचा मोठा सन्मान करतो पण मला असं वाटतं की राज ठाकरेंच नरेंद्र मोदींना जास्त घाबरलेत, त्यांनी घाबरुन जायचं काही कारण नाही. त्यांनी मोदींच्या जवळ जायला पाहिजे आणि मोदींसाठी सर्व प्रजा एकसारखीच आहे, जशी रामाला सर्व प्रजा सारखीच होती. वयानं राज ठाकरे हे माझे छोटे भाऊ आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की, त्यांनी नरेंद्र मोदींना घाबरु नये तुम्ही महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत आहात त्यामुळं तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही. घाबरायचच असेल तर चुकीच्या कामांची भीती बाळगा"

Bhagat Singh Koshyari_Raj Thackeray
Sushil Raheja: मुजोर बिल्डर सुशील रहेजाविरोधात आंदोलन पेटलं! अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणी वंचित, मनसेनंतर आता काँग्रेसही आक्रमक

मनसचं एकाच वाक्यात पलटवार

कोश्यारींनी राज ठाकरेंना डिवचल्यानंतर मनसेनं एकाच वाक्यात त्यांच्यावर पलटवार केला आहे. "आम्ही ट्रम्पना घाबरणारे लोक नाहीत, त्यामुळं जे ट्रम्पला घाबरतात त्यांनी राज ठाकरेंबाबत अशी वक्तव्ये करु नयेत," या एका वाक्यातच मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी कोश्यारींना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com