शिंदे गटाच्या या आमदाराने पाहिली उद्धव ठाकरेंची संपूर्ण मुलाखत...

बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्रीवर जायला आम्हाला काही अडचण नाही. पण....
Bharat Gogawale
Bharat GogawaleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचे दोन्ही भाग मी बघितले. त्यात काही अडचण नाही, असे सांगून ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार असल्याचे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितले. (Bharat Gogawale has seen the complete interview of Uddhav Thackeray)

महाडचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. ते आज माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी आपण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना फोनवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार असल्याचे स्पष्ट केले.

Bharat Gogawale
Solapur In Monsson Session : प्रणिती शिंदेंच्या प्रश्नावर जयंतरावांनी मुश्रीफांची केली कोंडी; ‘अर्थमंत्री तुमचेच आहेत, घोषणा करा...’

गोगावले म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचे दोन्ही भाग मी पाहिले आहेत, त्यात काही अडचण नाही. उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात वर्षातून एकदा आनंदाचा दिवस येत असतो. आज उद्धवसाहेब आणि रामदास कदमांचाही वाढदिवस आहे. कदम यांना सकाळीच शुभेच्छा दिल्या. आता उद्धव ठाकरे यांनाही शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी घेतल्या तर ठीक आहे. आमच्या मनात तसं काही नाही.

Bharat Gogawale
Assembly Session : ‘झोपडपट्टी’बाबतचे बिल विधानपरिषदेने परत पाठविले; पृथ्वीराजबाबांनी सरकारला धू धुतले, फडणवीसांकडून चूक मान्य

उद्धव ठाकरेंची प्रकृती ठीक राहो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो, अशी शुभेच्छा आम्ही त्यांना देऊ शकतो. बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्रीवर जायला आम्हाला काही अडचण नाही. पण उद्धव ठाकरे यांनी जी काही आठ मजल्यांची मातोश्री बांधलेली आहे. तिकडं जायला आम्हाला अडचण आहे. कारण आठ मजले आम्ही चढू शकत नाही. पहिले आम्ही तीन मजले चढत होतो, तिकडं काही प्रश्न नाही. पण काही हरकत नाही, त्यांना आमच्या शुभेच्छा राहतील, अशा शुभेच्छा दिल्या.

Bharat Gogawale
Assembly Session : फडणवीसांकडून राहुल कुलांना गिफ्ट; एकाच दिवशी पाटसला पोलिस ठाणे, तर दौंडमध्ये चौकी मंजूर

त्याचवेळी गोगावले यांना नव्या मातोश्रीत लिफ्ट आहे ना, असे सुचविले तर त्यावर त्यांनी मजेशीर उत्तर दिले. ते म्हणाले की, लिफ्ट मध्येच बंद पडली तर अडचण होईल ना. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आम्ही उंचीवर नेतो. आम्ही त्याला कमीपणा येईल, असे काम करत नाही. जेव्हा आम्ही त्याला बाधा आणेल, तेव्हा त्यांनी बोलावे. तोपर्यंत त्यांनी बोलू नये, असा इशाराही गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com