Bharat Gogawale : भरत गोगावले मंत्रिपदाबाबत प्रचंड आशावादी...आता म्हणतात पुढच्या मंत्रिमंडळात 100 टक्के असेन!

Mahayuti Government : तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही मंत्रिपदावरून भरतशेठ गोगावलेंची फिरकी घेतली होती. पण, गोगावलेंना मंत्रिपदाने शेवटपर्यंत हुलकावणी दिली. मात्र, हार मानतील ते भरतशेठ कसले..?
Bharat Gogawale
Bharat GogawaleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 17 September : महाडचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले आणि मंत्रिपद हा राज्याच्या राजकारणात प्रचंड गाजलेला आणि उत्सुकतेचा विषय ठरला आहे. मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी आपण कोट शिवून ठेवला आहे, आता फक्त शपथच घ्यायची आहे, असे विधान त्यांनी केले होते. त्यावर तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही मंत्रिपदावरून भरतशेठ गोगावलेंची फिरकी घेतली होती.

पण, गोगावलेंना मंत्रिपदाने शेवटपर्यंत हुलकावणी दिली. मात्र, हार मानतील ते भरतशेठ कसले..? मंत्रिपदाबाबत प्रचंड आशावादी असलेले गोगावले आता निवडणुकीनंतर येणाऱ्या मंत्रिमंडळात आपला शंभर टक्के समावेश असेल, असे छातीठोकपणे सांगत आहेत.

महाड विधानसभा मतदारसंघातून भरत गोगावले (Bharat Gogawale) हे 2009 पासून सलगपणे निवडून येत आहेत. सलग तीन निवडणुका जिंकत भरत गोगावले यांनी आमदारकीच्या विजयाची हॅटट्रीक केली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होता. पण त्यांना ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळू शकले नाही.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर भरत गोगावले हे शिंदेंसोबत गुवाहाटीला गेले. पुढे शिंदे मुख्यमंत्री झाले, त्या वेळी झालेल्या मंत्र्यांच्या यादीत भरत गोगावले यांचे नाव निश्चित होते. मात्र, बंडाच्या वेळी साथ दिलेल्या काही नेत्यांनी परत शिवसेनेकडे जाण्याची धमकी दिली, त्यामुळे गोगावले यांची समजूत काढण्यात आली आणि मंत्रिपदाची संधी हुकली.

Bharat Gogawale
Assembly Election 2024 : विधानसभेसाठी ऑक्टोबरच्या ‘या’ तारखेला आचारसंहिता लागणार; शिंदे गटाच्या नेत्याने उघड केली रणनीती

पुढे अजित पवारच युतीसोबत गेले, त्यामुळे मंत्रिपदाची संख्या रोडावली. गेल्या देान अडीच वर्षांत अनेकदा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झाली. पण तो अस्तित्वात येऊ शकला नव्हता. मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी भरत गोगावले यांच्या नावाची चर्चा व्हायची. पण विस्तार काही व्हायचा नाही. आता होईल, मग होईल म्हणता म्हणता अडीच वर्षे निघून गेली. मात्र, भरतशेठ यांचे मंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

Bharat Gogawale
Mahayuti Election Strategy : महायुती जिंकणार 170 जागा; चंद्रकांतदादांनी सांगितलं आकड्यांचं गणित...

मंत्रिपदाच्या विषयावर बोलताना भरत गोगावले यांनी मंत्रिपदाची शपथ घेण्याची वेळ टळून गेल्याचे स्पष्ट केले. येत्या पाच तारखेला आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या वीस दिवसांसाठी मंत्रिपद कुणी घेऊ शकत नाही आणि देऊही शकत नाही. त्यामुळे मंत्रिपदाचा आतातरी विचार नाही. पण पुन्हा एकदा निवडून आल्यानंतर पुढच्या येणाऱ्या महायुतीच्या सरकारमध्ये भरतशेठ निश्चित मंत्री असेन, असा दावा गोगावले यांनी छातीठोकपणे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com