Bhaskar Jadhav: दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी भास्कर जाधवांची मध्यस्थी? एकनाथ शिंदेंना केलं महत्वाच आवाहन

Bhaskar Jadhav: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं हे जन्मशताब्दीवर्ष असून आज त्यांची १००वी जयंती आहे.
Bhaskar jadhav uddhav thackeray
Bhaskar jadhav uddhav thackeraysarkarnama
Published on
Updated on

Bhaskar Jadhav: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं हे जन्मशताब्दीवर्ष असून आज त्यांची १००वी जयंती आहे. पण आयुष्यभर ज्या मुंबईत राहुल बाळासाहेबांच्या शिवसेनेनं राजकारण केलं त्याच मुंबईच्या महापालिकेत पहिल्यांदाच शिवसेनाचा महापौर होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण ही परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला पाहिजे, अशी भूमिका शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी मांडली.

Bhaskar jadhav uddhav thackeray
MNS : गुजराती टेलरकडून मराठी महिलेला अर्वाच्च भोषेत शिवीगाळ! मध्यस्थी केल्यानं मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही लाख म्हणाल खरी शिवसेना आमची आहे. पण जग काय म्हणतंय, १९ जून १९६६साली शिवसेनाला जन्म कोणी दिला. बाळासाहेब ठाकरेंनी दिला. बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र कोण आहेत? तर ते उद्धव ठाकरे आहेत. तुम्ही शिवसेना भाजपच्या नादाला लागून तोडून घेऊन गेलात म्हणजे तुम्ही तिचे मालक होऊ शकत नाही. शेवटी जनता जनार्दनाला माहिती आहे कोण मालक आहे. भगवान के घर मे देर है मगर अंधेर नही. दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासाठी पुढाकार घेणार का? यावर भास्कर जाधव म्हणाले, 'जवाचे गहू तवाच्या पोळ्या' असं उत्तर दिलं.

Bhaskar jadhav uddhav thackeray
Balasaheb Thackeray: आता मशालीची धग...! बाळासाहेबांचं जुनं व्यंगचित्र शेअर करत शिवसेनेनं भाजपला डिवचलं

एकनाथ शिंदेंना मी आव्हान वजा विनंती करतो की, तुम्ही भाजपला सांगितलं पाहिजे की केंद्रात आम्ही तुमच्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे आम्ही तुमच्यासोबत राहू. राज्यात आम्ही तुमच्या पक्षाला पाठिंबा दिला आहे तर तुमच्यासोबत राहू. पण हे वर्ष हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दीवर्ष आहे. म्हणून आम्ही मुंबईवर हा शिवेसेनेचाच झेंडा फडकला पाहिजे आणि बाळासाहेबांचे वारसदार असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा म्हणजेच खऱ्या शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे.

त्यामुळं आम्ही आमचे राजकीय मतभेद बाजुला सारुन आम्ही बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ठाकरे जो उमेदवार देतील त्याला आम्ही मदत करु हे सांगण्याच धाडस एकनाथ शिंदेंनी दाखवलं पाहिजे. हे धाडस भास्कर जाधव असता तर नक्कीच दाखवलं असतं. त्यांनी भाजपला पाठिंबा देता कामा नये, जर तुम्ही बाळासाहेबांचे वारसदार सांगत असाल, त्यांच्यामुळं आम्ही घडलो म्हणून सांगत असाल तर बाळासाहेबांच्या जन्मशतब्दीवर्षी तुम्ही तुमचा मान, सन्मान, गर्व, अहंकार, अपमान बाजुला सारुन बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा मुंबईवर फडकवण्यासाठी तुम्ही कमीपणा घेतला पाहिजे, असं माझं जाहीर आव्हान वजा विनंती आहे, असंही भास्कर जाधव यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com