
Mumbai News : गेल्या काही दिवसांपासून नाना पाटेकर, अक्षय कुमार, कंगना रनौत, माधुरी दीक्षित आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. यात पाटेकर आणि अक्षय कुमारने निवडणूक लढवणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे, तर कंगनाने थेट नाही निवडणूक लढवण्याबाबत सूचक वक्तव्य केली आहेत. यावरून तरी ती उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. याचवेळी माधुरी दीक्षितची भूमिका अद्यापही गुलदस्तात आहे. पण याचवेळी आता नव्वदचं दशक गाजवलेला आणखी एक अभिनेता लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आहे.
भाजपच्या बालेकिल्ल्यात 2004 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा रोवून 'जायंट किलर' ठरलेला अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा राजकारणात उतरणार आहे. पण यंदा काँग्रेस नाही तर शिंदे गटाची साथ करणार असल्याची माहिती समोर येत आहेअभिनेता गोविंदाने काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची त्यांच्या वर्षा बंगल्यावर भेट घेतल्याचे बोलले जात आहे.
ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केलेल्या अमोल कीर्तिकरांच्या मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी गोविदांचं नाव चर्चेत आलं आहे. ठाकरेंना शह देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मोठा डाव टाकण्याची शक्यता आहे. त्याचाच एक भाग म्हणून गोविंदाच्या राजकीय एन्ट्रीचे संकेत दिले जात आहेत. लवकरच गोविंदा शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अभिनेता गोविंदा (Govinda) आहुजा याचं नाव सध्या उत्तर पश्चिम मुंबईसाठी चर्चेत आहे. यापूर्वी गोविंदानं 2004 मध्ये उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवताना भाजपचे दिग्गज नेते राम नाईकांना पराभवाचा धक्का दिला होता. हा पराभव भाजप आजतागायत विसरलेली नाही.अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात शिंदेंकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. त्यात गोविंदाचे नाव आघाडीवर आहे. ठाकरेंनी रिंगणात उतरवलेला आणि विद्यमान खासदार गजानन कीर्तिकरांचे चिरंजीव अमोल कीर्तिकरांसमोर तगडे आव्हान उभे करण्यासाठी शिंदेंनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर गोविंदा शह देणार का?हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.