NCP News: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्रीपदाची रविवारी शपथ घेतली. त्यांच्यासह एकूण नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादी पक्षावर दावा केल्यामुळे राजकारण तापलं आहे.
यानंतर आता सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून अजित पवार नियुक्ती कऱणार असल्याची माहिती समोर आली आहे. देवगिरीवर झालेल्या बैठकीत अजित पवारांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. तर याबाबत थोड्याच वेळात अजित पवार हे अधिकृत घोषणा करणार असल्याचं समजतं आहे.
अजित पवार यांनी बंड केल्यानंतर आम्ही पक्षासोबत आहोत आणि पक्षाच्या चिन्हावरच पुढच्या निवडणुका लढवू, असं भाष्य त्यांनी केलं होतं. यानंतर आता अजित पवार यांनी पक्ष पातळीवरती पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी सुरुवात केली आहे.
याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्याकडून आता नवीन प्रदेशाध्यक्षांचे नाव घोषीत करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
अजित पवार गटाचा प्रतोद ठरला
अजित पवार यांनी बंड केल्यानंतर आता पक्ष पातळीवरती पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी सुरुवात केली आहे. अजित पवार यांच्या गटाचा प्रतोद ठरला आहे. अनिल पाटील हे आता अजित पवार गटाचे प्रतोद असणार आहेत. याबाबतची माहिती अनिल पाटील यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना दिली आहे.
Edited By : Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.