Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

Sanjay Raut News : मोठी बातमी ! संजय राऊतांची शिवसेनेतून हकालपट्टी होणार?

Shivsena News: राष्ट्रीय कार्यकरणीत पक्षाचे सर्व अधिकार हे एकनाथ शिंदेंना देण्यात आले आहेत
Published on

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी माहिती समोर आली आहे. खासदार संजय राऊत यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पक्षविरोधात बोलणे, पक्षातील नेत्यांची बदनामी करणे, पक्षविरोधी पावले उचलणे असा ठपका ठेवत राऊतांविरोधात ही कारवाई केली जाणार आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिंदे गटाच्या राष्ट्रीय कार्यकरणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्य पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच यावेळी पक्षाचे सर्व अधिकारही एकनाथ शिंदे यांच्याकडेच देण्यात आले.

Sanjay Raut
Maharashtra Politics: एवढ्या लवकर निकाल लागणार नाही; ठाकरे गटाच्या नेत्याचं सूचक विधान

यासोबतच या राष्ट्रीय कार्यकरणीत त्रिसदस्यीय शिस्तभंग समितीचीदेखील स्थापना करण्यात आली आहे. आता ही त्रिसदस्यीय समिती संजय राऊत यांची शिवसेनेतून हकालपट्टी करणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com