Manohar Joshi Health Update: मनोहर जोशींच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; 22 दिवसांच्या उपचारानंतर...

Manohar Joshi News: मनोहर जोशी यांना मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यामध्ये अडथळा निर्माण झाल्याने, त्यांना अस्वस्थ वाटत होते.
Manohar Joshi
Manohar Joshi Sarkarnama

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना सोमवारी ( १२जून) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या २२ दिवसांपासून त्यांच्यावर पी. डी. हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु होते. हिंदुजा रुग्णालयाने मीडिया स्टेटमेंट जारी करुन मनोहर जोशी यांच्या प्रकृतीविषयी अपडेट दिली आहे.

मनोहर जोशी यांना मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यामध्ये अडथळा निर्माण झाल्याने, त्यांना अस्वस्थ वाटत होते. न्यूरोलॉजिस्ट डॉ. चारुलता संकला यांच्या निगराणीखाली उपचार करण्यात आले. तसेच त्यांना श्वास घेण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे २२ मे रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीही रुग्णालयात जाऊन मनोहर जोशी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

Manohar Joshi
Aditya Thackeray Birthday : महाराष्ट्राच्या राजकारणाचं भविष्य, नव्या पिढीचं नेतृत्व; राऊतांच्या आदित्यांना अनोख्या शुभेच्छा...

जोशी हे 1966 पासून शिवसेनेचे सदस्य आहेत. शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात 1995 ते 1999 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. 2002 ते 2004 या काळात ते लोकसभेचे अध्यक्षही होते.

शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले जोशी हे बाळासाहेबांचे निकटवर्तीय मानले जातात. मनोहर जोशी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात शिक्षक म्हणून केली. पण 1967 मध्ये राजकारणात प्रवेश केला. 1976 ते 1977 या काळात त्यांनी मुंबईचे महापौरपदही भूषवले. 1995 मध्ये शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली. त्यानंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.

Manohar Joshi
Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री शिंदेंसोबचा देवेंद्र फडणवीसांचा दौरा रद्द; राजकीय वर्तुळात चर्चा...

मनोहर हे महाराष्ट्राचे पहिले बिगर काँग्रेस मुख्यमंत्री होते. 2002 ते 2004 पर्यंत ते लोकसभेचे अध्यक्ष होते. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात ते केंद्रीय अवजड उद्योग मंत्री होते. मात्र, वृद्धापकाळामुळे ते गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रिय नाहीत.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com