उद्धव ठाकरे हे आव्हाडांना बाप वाटत असावेत ; चंद्रकांतदादांचा पलटवार

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यातील वादाचा गुरुवारी भडका उडाला. 'आव्हाडांनी माझा बाप काढला. ही त्यांची संस्कृती आहे.
Jitendra Awhad, Uddhav Thackeray Chandrakant Patil

Jitendra Awhad, Uddhav Thackeray Chandrakant Patil

sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : अधिवेशनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीवरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यातील वादाचा गुरुवारी भडका उडाला.

'आव्हाडांनी माझा बाप काढला. ही त्यांची संस्कृती आहे. पण आव्हाडांना उद्धव ठाकरे हे त्यांचा बाप वाटत असावा ; ठाकरेंशी जवळीक करून त्यांना फाईल क्लेअर करून घ्यायची असेन,” अशा शब्दांत प्रत्युत्तर देत, पाटील यांनी आव्हाडांवर घणाघातच केला. परिणामी, विधीमंडळात राजकीय संघर्ष आता आव्हाड आणि पाटलांच्या घरापर्यंत गेला आहे.

<div class="paragraphs"><p>Jitendra Awhad,&nbsp;Uddhav Thackeray Chandrakant Patil</p></div>
आपला बाप आजारी असताना चर्चा करतो का ? आव्हाडांचा चंद्रकांतदादांना सवाल

''मुख्यमंत्र्यांना काम जमत नसेन ; तर मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार रश्मी ठाकरे किंवा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे द्यावा,'' अशी सूचनावजा खोपरखळी पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना सभागृहात मारली. त्यावरून कोणी आजारपणात असताना बोलू नये, अशी विनंत करीत, आव्हाडांनी आपला बाप आजारी असेन; आपण बोलतो का ? अशी विचारणा त्यांनी केली. त्यावरून संतापलेल्या पाटलांनीही आव्हाडांना त्याच भाषेत उत्तर देऊन मोकळे झाले.

विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पाटील यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. तेव्हा, थेट आव्हाडांवर पाटील बोलले. चंद्रकांत पाटील म्हणाले, "माझ्यावर आरएसएसचे संस्कार आहेत. मी कोणाला वाईट बोलत नाही मात्र, आव्हाडांनी माझा बाप काढल्याने त्यांची संस्कृती दिसून आली. माझा बाप राजकारणात किंवा सत्तेत नव्हता. त्यामुळे ते जबाबदार घटक ठरत नाहीत. मुख्यमंत्री हे जबाबदार असल्याने मी प्रश्न उपस्थित केला. अशा काळात कामांवर परिणाम नको म्हणून त्यांची विभागणी सूचविली. त्यामुळे आव्हाडांनी एवढा आक्रस्ताळेपणा करायला नको होता." "ठाकरेंशी जवळीक करून आव्हाड यांना एखाद्या फाईलचे काम करून घ्यायचे असेन; म्हणून ते एवढे बोलले, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

<div class="paragraphs"><p>Jitendra Awhad,&nbsp;Uddhav Thackeray Chandrakant Patil</p></div>
चंद्रकांतदादा तुमची किव येते, अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का?

"पेपरफुटी प्रकरणात मंत्र्यांनी आरोप करू नयेत. माहिती असेन थेट चौकशी सुरू केली पाहिजे त्यामुळे दोषींवर कारवाई होईल. हिंदुत्वापासून लांब गेलेल्यांनी भाजपला काही शिकवू नये. देशभरातील २२ कोटी मतदारांनी पंतप्रधान मोदींना मते दिली आहेत याच काळात भाजपचे हिंदुत्व विस्तार असल्याने शिवसेना अस्वस्थ झाली आहे, त्याच्या नैराश्यातून ते आरोप करीत आहेत,'' असेही पाटील यांनी सांगितले.

''जितेंद्र आव्हाडांना दुसऱ्यांच्या बाप काढायची सवय आहे. ते उद्धव ठाकरे स्वतः चा बाप मनात असतील, त्याबाबत त्यांनी मला समजावण्याची गरज नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांची तब्येत बरी होण्यासाठी मी प्रार्थना करतो,'' असे पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटलांनी बुधवारी केलेल्या विधानावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पलटवार केला होता. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, ''जेव्हा गरज लागेल तेव्हा मुख्यमंत्री विधानभवनात येतील. कुणाच्या तरी आजारपणावर टीका करणे ही प्रगल्भता नाही. आपला बाप आजारी असताना आपण चर्चा करतो का ? ती आपली संस्कृती नाही ना?''

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com